सध्या सोशल मीडियाचा काळ सुरु आहे आणि यामध्ये प्रत्येकाला फोटोज आणि स्वतःची सेल्फी काढण्याचे वेड लागले आहे. त्यामुळे स्मार्टफोन देखील पॉवरफूल कॅमेरे आणि उत्कृष्ट सेल्फी कॅमेऱ्यांनी सुसज्ज केले जात आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही Selfie लव्हर असाल आणि चांगला फ्रंट Camera असलेला फोन शोधत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुमच्यासाठी बेस्ट सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या निवडक फोन्सची यादी तयार केली आहे. बघा यादी-
Vivo चा V27 Pro हा सेल्फी प्रेमींसाठी सर्वोत्तम फोन आहे. कमी किमतीच्या या फोनमध्ये 50 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. Vivo V27 Pro मध्ये 50MP (OIS) प्रायमरी कॅमेरा आहे, दुसरा लेन्स 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल आणि तिसरा लेन्स 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. Vivo V27 Pro मध्ये 4600mAh बॅटरी आहे आणि 66W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.
Samsung च्या या फोनला सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड कॅमेरा फोन म्हणता येईल. म्हणजेच सेल्फी कॅमेर्यापासून ते मागील कॅमेर्यापर्यंत अनेक सेन्सर्स फोनमध्ये उपलब्ध आहेत. फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे, जो भरपूर कस्टमायझेशनसह येतो. प्रायमरी लेन्स हा 200 MP चा ISOCELL HP2 सेन्सर आहे, दुसरा लेन्स 12 MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर आहे आणि इतर दोन लेन्स 10-10MP आहेत, ज्यापैकी एक टेलीफोटो लेन्स आहे.
यामध्ये तुम्हाला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि VDIS देखील कॅमेरासोबत उपलब्ध असतील. कॅमेरासोबत 100X स्पेस झूम देण्यात आला आहे, ज्याद्वारे तुम्ही चंद्राचे फोटो देखील कॅप्चर करू शकता.
Vivo X90 Pro ची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात कॅमेर्यासाठी वेगळा Vivo V2 चिपसेट आहे, जो कॅमेराची कार्यक्षमता वाढवतो. Vivo च्या या कॅमेरा फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. ज्यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे, जो Zeiss ब्रँडिंगसह येतो. तसेच, फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 50-12 MP चे इतर कॅमेरा डेप्थ आणि अल्ट्रा वाइड अँगलसह आहेत.
Xiaomi चा हा फ्लॅगशिप फोन 32MP च्या सेल्फी कॅमेरासह येतो. Xiaomi 13 Pro सह कॅमेरा सेन्सरमध्ये Leica चे ब्रँडिंग आहे. हा स्मार्टफोन Leica कडून 75mm फ्लोटिंग टेलीफोटो लेन्स असलेला जगातील पहिला स्मार्टफोन आहे. यामध्ये तीन मागील कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 50MP चा Sony IMX989 सेन्सर आहे, सेकंडरी लेन्स 50MP चा वाईड अँगल आणि तिसरा लेन्स 50MP चा टेलीफोटो लेन्स आहे.