Best Redmi Phones Under 10000: बजेट किमतीत प्रसिद्ध कंपनीचे अप्रतिम 5G स्मार्टफोन्स उपलब्ध, पहा यादी 

Best Redmi Phones Under 10000: बजेट किमतीत प्रसिद्ध कंपनीचे अप्रतिम 5G स्मार्टफोन्स उपलब्ध, पहा यादी 
HIGHLIGHTS

फक्त 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक पॉवरफुल 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Redmi कडे अनेक अप्रतिम 5G स्मार्टफोन बजेट स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत.

Redmi ने अलीकडेच Redmi A4 5G फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे.

Best Redmi Phones Under 10000: जर तुम्ही देखील तुमच्या पालकांसाठी बजेट किमतीत एक उत्तम 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी 10000 रुपयांचे बजेट अगदी योग्य आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi ने अगदी कमी किमतीत अप्रतिम 5G स्मार्टफोन्स उपलब्ध करून दिले आहेत. तुम्ही फक्त 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक पॉवरफुल 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Redmi ब्रँडच्या सर्वोत्तम 5G स्मार्टफोन्सची यादी-

Also Read: आकर्षक डिझाईनसह येणाऱ्या Motorola Edge 50 Fusion वर मिळतोय भारी Discount, पहा Best डील

Redmi A4 5G

Redmi A4 5G

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi ने अलीकडेच Redmi A4 5G फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Amazon वर 9,499 रुपये इतकी आहे. फोनच्या मुख्य तपशिलांबद्दल बोलायचे झाल्यास, रेडमी फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4S Gen 2 5G प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5160mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Redmi 14C 5G

at just 9999 rs redmi 14c 5g
Redmi 14C 5G

Redmi चा Redmi 14C 5G स्मार्टफोन अगदी आकर्षक डिझाईन आणि लुकसह लाँच करण्यात आला आहे. लक्षात घ्या की, Redmi 14C 5G फोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 9,999 रुपयांना खरेदी करता येईल. स्मार्टफोनमधील फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Redmi फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4S Gen 2 5G प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5160mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Redmi 13C 5G

redmi 13c 5g
Redmi 13C

Redmi 13C 5G स्मार्टफोन हा बजेट किमतीत अप्रतिम स्मार्टफोन आहे. Redmi 13C 5G फोनचा 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 9,099 रुपयांना खरेदी करता येईल. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या Redmi फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+ 5G प्रोसेसर उपलब्ध आहे. तर, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo