प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने 25,000 रुपयांच्या खाली अनेक अप्रतिम स्मार्टफोन्स भारतात उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीने मिड बजेटमध्ये उत्तम डिस्प्ले, कॅमेरा फीचर्स, बॅटरी लाइफ आणि प्रोसेसरसह अनेक फोन्स लाँच केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Motorola कडे Motorola Edge 50 Neo, Motorola Edge 50 Fusion, Motorola Edge 40 Neo, Moto G85, Motorola Edge 30 सारखे फोन 25 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात येणाऱ्या या फोन्सची किंमत आणि सविस्तर तपशील-
Also Read: Realme Narzo 70 Turbo 5G फोनवर होतोय ऑफर्सचा मोठ्या प्रमाणात वर्षाव! भारी Earbuds देखील Free
Motorola Edge 50 Neo च्या 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये इतकी आहे. हा कॉम्पॅक्ट स्मार्टफोन असून त्याचे वजनही हलके आहे. जर तुम्हाला कॅमेरा आणि स्टायलिश फोनचे शौकीन असेल, तर Motorola Edge 50 Neo तुमच्यासाठी आहे. यामध्ये 120Hz रीफ्रेश रेटसह 6.4-इंच लांबीचा FHD+, P-OLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरसह उपलब्ध आहे. फोनमध्ये 50MP+13MP+10MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा 32MP चा आहे.
Motorola Edge 40 Neo च्या 8GB+128GB व्हेरिएंटची किमत 23,590 रुपये इतकी आहे. Motorola Edge 40 Neo हा एक स्टाइलिश डिझाइन असलेला फोन आहे, जो IP68 रेटिंग आणि उच्च दर्जाच्या डिस्प्लेसह येतो. यामध्ये 144Hz रीफ्रेश रेटसह 6.55-इंच लांबीचा FHD+, P-OLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 7030 प्रोसेसरसह उपलब्ध आहे. फोनमध्ये 50MP+13MP रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा 32MP चा आहे.
Motorola Edge 50 Fusion फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये इतकी आहे. जर तुम्ही 25000 रुपयांच्या आत स्टायलिश आणि हलके डिझाइन केलेला फोन शोधत असाल, तर तुमच्यासाठी Motorola Edge 50 Fusion हा पर्याय असू शकतो. फोन आकर्षक डिस्प्ले, उत्तम परफॉर्मन्स आणि कॅमेरा सेटअपसह येतो. यामध्ये 144Hz रीफ्रेश रेटसह 6.67 इंच लांबीचा FHD+, P-OLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसह उपलब्ध आहे. फोनमध्ये 50MP+13MP रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा 32MP चा आहे.
Motorola Edge 30 फोनच्या 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये इतकी आहे. फोनची खास गोष्ट म्हणजे त्याचे कॅमेरे वेगवेगळ्या प्रकाश परिस्थितीत चांगले काम करतात, तर डिस्प्ले स्मूथ आणि सॉफ्टवेअरही स्वच्छ आहे. यामध्ये 144Hz रीफ्रेश रेटसह 6.5 इंच लांबीचा FHD+, P-OLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 778G Plus प्रोसेसरसह उपलब्ध आहे. फोनमध्ये 50MP+50MP+2MP रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा 32MP चा आहे.