Best Smartphones Under 15000
Best Smartphones Under 15000: अलीकडील काळात स्मार्टफोन्समध्ये अनेक नवनवीन टेक्नॉलॉजी आणि अपग्रेड्स आले आहेत. खरं तर, सुरुवातीला स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना कमी किमतीत फक्त मूलभूत फीचर्स मिळत होते. मात्र, आता स्मार्टफोन निर्माता बजेट आणि मध्यम श्रेणीतील उत्तम फीचर्ससह स्मार्टफोन सादर करत आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 15000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत. हे फोन्स विशेषतः 8GB रॅमसह येतात. पहा यादी-
Also Read: Hey Barbie! रेट्रो डिझाईनसह HMD चा फ्लिप फोन भारतात लाँच, अगदी बजेटमध्ये आहे किंमत
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने अलीकडेच Samsung Galaxy M16 5G फोन भारतात लाँच केला आहे. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट असलेला हा फोन Amazon वरून 15,499 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. उत्तम परफॉर्मन्ससह, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP कॅमेरा सारखे फीचर्स मिळतील.
Redmi 13 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट असलेला फोन Amazon वरून 13,998 रुपयांना खरेदी करता येईल. Redmi Note 13 5G मध्ये 6.67 इंचाचा FHD+ pOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. कंपनीने डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन दिले आहे. हा फोन 108MP कॅमेरा सारख्या फीचर्ससह सुसज्ज आहे. याशिवाय, फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे.
Motorola G45 5G फोनच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट असलेला फोन Amazon वरून 11,948 रुपयांना खरेदी करता येईल. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, Moto g45 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच लांबीचा LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोटेक्शनसाठी, या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण देखील मिळते. तर, फोटोग्राफीसाठी Moto G45 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Realme 13 5G फोनच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट असलेला Realme 13 5G फोन Amazon वरून 14,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. याशिवाय, फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर आहे. रेनवॉटर स्मार्टटच तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे फोन ओल्या बोटांनीही वापरता येईल. Realme 13 5G मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आहे, जो Sony LYT-600 सेन्सर आहे. यात OIS सह 2MP पोर्ट्रेट लेन्स आहे.