Best Gaming Phones Under 15000: स्वस्त किमतीत गेमिंगसाठी 5 सर्वोत्तम फोन्स उपलब्ध, पहा यादी

Updated on 27-Nov-2024
HIGHLIGHTS

स्मार्टफोन कंपन्या 15000 रुपयांच्या अंतर्गत उत्तम गेमिंग स्मार्टफोन्स सादर करतात.

कमी किमतीतही फोन्समध्ये गेमिंगसाठी जबरदस्त फीचर्स दिले जातात.

iQOO, Vivo इ. टॉप ब्रँड्सचे स्मार्टफोन यादीत उपलब्ध

Best Gaming Phones Under 15000: आपणा सर्वांना माहितीच आहे की, आजकाल तरुणाईमध्ये गेमिंगची क्रेझ वाढतच चालली आहे. त्यामुळे स्मार्टफोन्स कंपन्या देखील बाजरात अनेक गेमिंग स्मार्टफोन्स उपलब्ध करून देत आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोन कंपन्या हे फोन्स 15000 रुपयांच्या अंतर्गत सादर करतात. या फोन्समध्ये गेमिंगसाठी जबरदस्त फीचर्स दिले जातात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात 15,000 रुपयांअंतर्गत येणारे 5 सर्वोत्तम स्मार्टफोन्स-

Also Read: 50MP कॅमेरासह Redmi A4 5G ची भारतात आज पहिली सेल! बजेट स्मार्टफोनवर अप्रतिम ऑफर्स उपलब्ध

iQOO Z9x

iQOO Z9x स्मार्टफोन या वर्षी मे महिन्यात लाँच करण्यात आला होता. या फोनची किंमत 12,499 रुपयांपासून सुरू होते. हे Snapdragon 6 Gen 1 चिपसेटद्वारे समर्थित आहे. याशिवाय 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. त्याबरोबरच, कंपनीने या फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे, जो 120hz चा रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन सोशल मीडिया आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगसारखी कामे आरामात करतो. याशिवाय, हा त्याच्या सेगमेंटमधील सर्वोत्तम बॅटरी बॅकअप फोनपैकी एक आहे.

iQOO Z9x 5G

Vivo T3x

Vivo T3x या वर्षी एप्रिल महिन्यात लाँच करण्यात आला होता. 15,000 रुपयांपेक्षा स्वस्त असलेला हा फोन 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यात स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेटची पॉवर मिळेल. Vivo T3X ची सुरुवातीची किंमत 12,999 रुपये आहे. हा त्याच्या विभागातील सर्वोत्तम गेमिंग फोनपैकी एक आहे. हा फोन 120 Hz रिफ्रेश रेट 6.72-इंच लांबीच्या टचस्क्रीन डिस्प्लेसह येतो. तसेच, Vivo T3x 5G फोनमध्ये 44W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.

Moto G64

Moto G64 ने देखील या वर्षी एप्रिल महिन्यात मार्केटमध्ये प्रवेश केला होता. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह या फोनची किंमत 13,999 रुपयांपासून सुरू होते. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7025 चिपसेटचा सपोर्ट आहे. Moto G64 5G मध्ये 6.5-इंच लांबीचा FHD+ IPS LCD डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे.

Redmi 13

Redmi 13 फोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उत्कृष्ट परफॉर्मन्स असलेला स्मार्टफोन असू शकतो. हा फोन या वर्षी जुलैमध्ये लाँच करण्यात आला होता. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 4 Gen 2 चिपसेटद्वारे समर्थित आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये Samsung ISOCELL HM6 108 मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरा आहे, जो 3x सेन्सर झूमसह येतो. याशिवाय 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये टाइप-C चार्जिंग पोर्टसह 5030mAh बॅटरी आहे.

Moto G45

Moto G45 हा एक उत्तम परफॉर्मन्स असलेला फोन आहे, जो ऑगस्टमध्ये लाँच करण्यात आला होता. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 6s Gen 3 चिपसेटद्वारे समर्थित आहे. हे तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात आणि मल्टीटास्किंगमध्ये चांगली मदत करेल. या फोनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरू होते. स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच लांबीचा डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोन 50MP चा मेन रियर कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :