भारतात Rs 10,000 च्या आत येणारे बेस्ट फिंगरप्रिंट स्कॅनर असलेले फोन

Updated on 29-Nov-2018
HIGHLIGHTS

जर तुम्ही असा फोन घेऊ इच्छित असाल जो सिक्यूरिटीच्या बाबतीत सिक्योर असेल आणि तुमचा डेटा तुमच्या बजेट मधेच सुरक्षित ठेवेल तर आज आम्ही तुम्हाला Rs 10,000 च्या आत येणाऱ्या काही मोबाईल फोन्स बद्दल सांगणार आहोत, जे फिंगरप्रिंट सेंसर सह येतात.

जर तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या सिक्यूरिटी आणि एक्सेस बद्दल चिंतिती आहात, किंवा मग तुमचा फोन तुमच्या परवानगी शिवाय कोणीही वापरात असेल आणि तुमच्या फोन मधील डेटाचा गैरवापर होऊ नये तसेच त्याला कोणी नुकसान पोहचवू नये असे तुम्हाला वाटते का. असे असल्यास तुम्हाला एक असा फोन पाहिजे, जो सुरक्षा आणि सिक्यूरिटीच्या दृष्टीने चांगला असेल. यासाठी एक फीचर जो आजकाल स्मार्टफोन्स मध्ये कॉमन झाला आहे, तो आहे फिंगरप्रिंट स्कॅनर, याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोनवर पूर्णपणे नजर ठेऊ शकता, आणि इतर कोणी तुमच्या परवानगी विना तुमचा फोन ओपन पण करू शकणार नाही. यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही अशा स्मार्टफोन्स बद्दल सांगणार आहोत जे Rs 10,000 च्या आत येतात आणि ज्यात फिंगरप्रिंट सेंसर आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या फोन मध्ये सारखा सारखा पासवर्ड पण टाकावा लागणार नाही. तुमच्या बोटानेच तुमचा फोन ओपन/अनलॉक करता येईल. बायो-मेट्रिक दृष्टीने तुमचा फोन अशा फीचर मुळे सुरक्षित म्हणता येईल. चला तर मग जाणून घेऊया या मोबाईल फोन्स बद्दल.

InFocus Epic 1

हा मोबाईल फोन मे 2017 मध्ये लॉन्च केला गेला होता. तसेच लक्षात असू दे कि या मोबाईल मध्ये 5.5-इंचाचा डिस्प्ले पण आहे. मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 2.4GHz चा डेका-कोर मीडियाटेक MT6797M प्रोसेसर मिळत आहे, सोबतच फोन मध्ये एक 3GB चा रॅम पण आहे. 

Xiaomi Redmi Note 4

Xiaomi Redmi Note 4 मोबाईल फोन 32GB स्टोरेज सह मे 2017 लॉन्च केला गेला होता. तसेच हा मोबाईल फोन 5.5-इंचाच्या डिस्प्ले येतो. फोन मध्ये एक 2GHz चा ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 625 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हा मोबाईल फोन 2GB आणि 3GB रॅम मॉडेल्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. 

ZTE Blade A2 Plus

हा मोबाईल फोन लॉन्च होऊन आता जवळपास 2 वर्षे झाले आहेत. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 5.5-इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 1.55GHz चा ओक्टा-कोर मीडियाटेक MT6750T प्रोसेसर मिळत आहे. फोन 4GB रॅम सह लॉन्च केला गेला आहे. 

Coolpad Note 5

हा फोन पण 2017 मध्ये लॉन्च केला गेला आहे. यात तुम्हाला 5.5-इंचाचा डिस्प्ले मिळत आहे, तसेच हा फोन तुम्हाला 1.5GHz की ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 617 प्रोसेसर सह मिळत आहे. या फोन मध्ये 4GB चा रॅम देण्यात आला आहे. 

Lenovo K6 Power

हा मोबाईल फोन 5-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च केला गेला होता. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 1.4GHz चा ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 430 चिपसेट मिळत आहे. तसेच फोन 3GB आणि 4GB रॅम सह लॉन्च केला गेला आहे.
 

 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :