iQOO ची तिसरी ऍनिव्हर्सरी ! ‘हे’ 3 जबरदस्त स्मार्टफोन्स मिळतायेत स्वस्तात

Updated on 20-Apr-2023
HIGHLIGHTS

iQOO भारतात तिसरी ऍनिव्हर्सरी साजरी करत आहे.

यानिमित्त कंपनीचे स्मार्टफोन्स उत्तम डील्ससह उपलब्ध आहेत.

सेल iQOO च्या ऑनलाइन स्टोअर आणि Amazon India वर सुरु

iQOO ने भारतात तीन वर्षे पूर्ण केली आहेत आणि कंपनी तिसरी अनिव्हर्सरी साजरी करत आहे. या दरम्यान, कंपनी iQOO 11, iQOO 9 Pro आणि iQOO 9 इत्यादी स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. iQOO 9 आणि iQOO 9 Pro फेब्रुवारी 2023 मध्ये सादर करण्यात आले. ही सेल 19 एप्रिलपासून सुरु झाली असून 24 एप्रिलपर्यंत चालणार आहे. हा सेल iQOO च्या ऑनलाइन स्टोअर आणि Amazon India वर सुरु आहे. 

iQOO 11

iQOO 11 भारतात 59,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. परंतु सध्या तो 49,990 रुपयांना विकला जात आहे. हा स्मार्टफोन Amazon वर 54,990 मध्ये सूचिबद्ध आहे. यासह ICICI बँक ऑफर अंतर्गत कंपनी 5000 रुपयांची सूट देत आहे.

iQOO 9 Pro

iQOO 9 Pro Amazon वर 44,990 रुपयांना सूचिबद्ध आहे. स्मार्टफोनची खरी किंमत 64,990 रुपये आहे. ICICI कार्डवरून खरेदी केल्यास 5000 रुपयांची सवलत देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारे फोनची किंमत 39,990 रुपयांपर्यंत खाली येईल.

iQOO 9

 हा iQOO स्मार्टफोन 12,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकला जात आहे. iQOO 9 Amazon वर 35,990 रुपयांना उपलब्ध आहे. फोनची मूळ किंमत 42,990 रुपये आहे. अशा प्रकारे iQOO च्या या फोनवर 7000 रुपयांची सूट दिली जात आहे. वरील फोन्सप्रमाणे यात देखील ICICI कार्ड खरेदीवर 5,000 रुपयांची सूट मिळत आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :