अप्रतिम डील ! Samsungचा 1 लाख रुपयांचा फोन 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा, जाणून घ्या कसं ?

अप्रतिम डील ! Samsungचा 1 लाख रुपयांचा फोन 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा, जाणून घ्या कसं ?
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S22 Series वर मिळतेय अप्रतिम ऑफर

एक लाख रुपयांचा फोन 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा

स्टायलिश कलर ऑप्शन्समध्ये स्मार्टफोन्स उपलब्ध

Samsungने भारतातील युजर्ससाठी सर्वोत्तम ऑफर आणली आहे. तुम्हाला सॅमसंग फोनवर NO COST EMI पर्याय मिळत आहे. सॅमसंग तुम्हाला आपल्या प्रीमियम फोनवर 24 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI ऑफर करत आहे. सॅमसंग इंडियाच्या वापरकर्त्यांसाठी कंपनीने ही घोषणा केली आहे.

या ऑफरद्वारे तुम्हाला सॅमसंगचे अनेक प्रीमियम फोन खरेदी करता येतील. तुम्हाला ही ऑफर Samsung Galaxy S22 Series वर दिली जात आहे, इतकेच नाही तर तुम्हाला ही ऑफर Galaxy Z Fold 3 5G वर देखील मिळत आहे. तसेच, तुम्हाला ही ऑफर Galaxy Z Flip 3  5G वर देखील मिळेल. या ऑफर अंतर्गत तुम्हाला Samsung Galaxy S22 दरमहा 3,042 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करता येईल.

samsung galaxy s22 seires

Samsung Galaxy S22 Ultra बद्दल सांगायचे झाले तर, हा फोन 4,584 रुपये प्रति महिना EMI वर खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्हाला हे फोन 5000 रुपयांपेक्षा कमी किमतीत स्वतःचे बनवता येतील. या ऑफरसाठी कंपनीने HDFC बँकेसोबत भागीदारी केली आहे. रिटेल स्टोअरला भेट देऊन तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

हे सुद्धा वाचा : BSNLचे दोन जबरदस्त प्लॅन्स, फक्त 5 रुपयांमध्ये मिळेल दररोज मोफत कॉलिंग आणि बरंच काही

Samsung Galaxy S22 सिरीजची किंमत

samsung s22 seires

Samsung Galaxy S22 स्मार्टफोन 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेल 72,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो,  याव्यतिरिक्त 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलसाठी तुम्हाला 76,999 रुपये मोजावे लागतील. एवढेच नाही तर, जर तुम्हाला Galaxy S22+ खरेदी करायचे असेल, तर तुम्हाला त्याचे दोन्ही मॉडेल्स अनुक्रमे रु.84,999 आणि 88,999 रुपयांमध्ये मिळतील. याशिवाय, सर्वात प्रीमियम मॉडेल म्हणजेच Galaxy S22 Ultra मोबाईल फोन अनुक्रमे 1,09,999 रुपये आणि 1,18,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. तुम्हाला Samsung Galaxy S22 Ultra फँटम ब्लॅक, फँटम व्हाइट आणि बरगंडी कलर ऑप्शनमध्ये मिळेल. जर तुम्हाला Galaxy S22 आणि Galaxy S22+ स्मार्टफोन घ्यायचे असतील, तर तुम्हाला ते Phantom Black, Phantom White आणि Green या कलर ऑप्शन्समध्ये मिळणार आहेत.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo