सध्या स्मार्टफोन बाजारात सर्वात जास्त एंड्राइड स्मार्टफोन्सना मागणी असते. अलीकडेच अनेक एंड्राइड फ्लॅगशिप स्मार्टफोन्स 6GB DDR4 रॅम सह लॉन्च झाले आहेत जो अनेक नॉर्मल लॅपटॉप मध्ये असणाऱ्या रॅम सारखा आहे. दुसरीकडे डिस्प्लेच्या रेजोल्यूशन बद्दल बोलायचे तर आता घरात असलेल्या टेलीविजनचे रेजोल्यूशन पण फुल HD असते, तर अनेक स्मार्टफोन्स 2K रेजोल्यूशन तर काही 4K स्क्रीन रेजोल्यूशन सह सादर केले गेले आहेत. कॅमेरा क्वालिटी पण मोठ्या प्रमाणावर बदलण्यात आली आहे आणि प्रत्येक नवीन स्मार्टफोन सोबत हि अजून चांगली होत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता बाजारात अनेक चांगले पर्याय आहेत. आम्ही एक यादी तयार केली आहे ज्यात बेस्ट एंड्राइड फोन्सचा समावेश केला गेला आहे. हे स्मार्टफोन्स चांगली परफॉरमेंस आणि फीचर्स देतात.
Note 9 मध्ये 6.4 इंचाचा QHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो एक इंफिनिटी डिस्प्ले आहे आणि याचे रेजोल्यूशन 2960 x 1440 पिक्सल आहे. डिवाइस मध्ये कडेवर डेडीकटेड बिक्स्बी बटण पण देण्यात आले आहे. अन्य Galaxy Note लाइनअप प्रमाणे हा डिवाइस पण S पेन सह येतो. S पेन मध्ये ब्लुटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. Note 9 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 प्रॉसेसर आणि 8GB रॅम आहे. भारतीय वर्जन मध्ये एक्सिनोस 9810 प्रॉसेसर आहे. हा सॅमसंगचा असा पहिला फोन आहे जो 512 GB स्टोरेज सह सादर केला गेला आहे आणि याची स्टोरेज माइक्रो एसडी कार्ड द्वारा 512 GB पर्यंत वाढवता येते. डिवाइस मध्ये 4,000mAh ची बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग आणि फास्ट वायर्लेस चार्जिंगला सपोर्ट करते.
जर आपण डिस्प्ले पासून सुरवात केली तर सॅमसंग गॅलेक्सी S9 Plus मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 6.2-इंचाचा क्वाड HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, याचे रेजोल्यूशन 1440×2960 पिक्सल आहे. सॅमसंग गॅलेक्सी S9 Plus मोबाईल फोन बद्दल बोलायचे तर हा मोबाईल फोन Exynos 9810 ओक्टा-कोर प्रोसेसर सह लॉन्च केला गेला आहे, तसेच हा मोबाईल फोन तुम्ही भारतात मध्ये तीन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मध्ये घेऊ शकता.
या स्मार्टफोन मध्ये 6.1 इंचाचा फुल HD+ OLED फुल व्यू डिस्प्ले आहे आणि डिवाइसच्या फ्रंटला होम बटण आहे. Huawei P20 Pro मधील ट्रिपल कॅमेरा मध्ये 40 MP RGB 1/1.7-इंच सेंसर, 20 MP मोनोक्रोम सेंसर आणि 8MP टेलीफोटो लेंस आहे. डिवाइसच्या फ्रंटला 24.8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे जो 3D पोर्ट्रेट लाइट इफेक्टला सपोर्ट करतो. हा डिवाइस 360 फेस अनलॉक फीचर सह येतो जो सेकंदात डिवाइस अनलॉक करू शकतो. तसेच डिवाइस मध्ये 4000mAh ची बॅटरी आहे.
स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे तर पिक्सल 3 मध्ये 5.5 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे. Pixel 3 मध्ये 12 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो यूजर एक्सपीरियंस चांगला करण्यासाठी नाईट साइट, प्ले ग्राउंड आणि सुपर रेस झूम सारख्या फीचर्स सह येतो. डिवाइसच्या फ्रंटला दोन कॅमेरा मोड्यूल देण्यात आले आहेत, ज्यातील एक नार्मल लेंस आहे आणि दुसरी वाइड-एंगल लेंस आहे. डिवाइसच्या फ्रंटला दोन 8 मेगापिक्सलचे सेंसर्स आहेत.
हा एक वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंट फोन आहे जो QHD डॉल्बी विजन सर्टिफाइड डिस्प्ले सह येतो आणि 40,000 रुपयांच्या श्रेणीत हा एक चांगला विकल्प आहे. या बेस्ट एंड्राइड फोनच्या यादीत हा फोन पाचव्या स्थानी आहे.
Pixel 2 XL मध्ये 6 इंचाचा क्वाड HD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे आणि हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 835 चिपसेट सह येतो. Pixel 2 XL मध्ये 12MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो f/1.8 अपर्चर, डुअल पिक्सल ऑटोफोकस आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन सह येतो. याच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
OnePlus 6T मध्ये 6.41 इंचाचा ऑप्टिक AMOLED 19.5:9 डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 2340 x 1080p पिक्सल आहे आणि याची पिक्सल डेंसिटी 402 PPI आहे. स्क्रीनला नवीन कोर्निंग गोरिला ग्लास 6 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे आणि वनप्लस म्हणते कि नवीन नॉच मुळे डिवाइसचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 86 टक्के होतो जो OnePlus 6 मध्ये 83.8 टक्के होता. OnePlus नुसार कंपनीने डिस्प्लेची ब्राइटनेस लेवल, कलर एक्यूरेसी आणि कलर रेंज सुधारण्याचे पण काम केले आहे.
हा डिवाइस एका 6.2-इंचाच्या FHD+ एज-टू-एज नॉच स्क्रीन सह लॉन्च केला गेला आहे, हि 1080×2246 पिक्सल रेजोल्यूशन सह येते. फोनच्या या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेश्यो पाहता हा 19:9 आहे. फोन मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट आहे. या डिवाइस मध्ये तुम्हाला ड्यूल कॅमेरा मिळत आहे. तसेच या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा मिळत आहे, त्याचबरोबर तुम्हाला यात एक 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा पण मिळत आहे. फोन मध्ये एक 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण आहे. तसेच यात एक 3,300mAh क्षमता असलेली बॅटरी पण मिळत आहे. जी फास्ट चार्जिंगला पण सपोर्ट करते. हा डिवाइस एंड्राइड Oreo वर चालतो जो ZenUI वर आधारित आहे. फोन मध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉक फीचर पण मिळत आहे.
स्पेक्सची चर्चा करायची झाल्यास हा डिवाइस कंपनीने 5.84-इंचाच्या FHD+ LCD 19:9 आस्पेक्ट रेश्यो असेलेल्या डिस्प्ले सह लॉन्च केला आहे. यात तुम्हाला नॉच डिजाईन पण मिळत आहे. फोन 6GB रॅम सह EMUI 8.1 वर आधारित एंड्राइड Oreo सह सादर केला गेला आहे. तसेच फोन मध्ये एक 3,400mAh क्षमता असलेली मोठी बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. फोन मध्ये एक 24-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 16-मेगापिक्सलचा एक सेकेंडरी कॅमेरा मिळत आहे. सोबत फोन मध्ये एक 24-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण आहे.
Samsung Galaxy S8 एक चांगल्या डिजाइन सह येतो आणि यात एक्सिनोस 8895 SoC आहे जो 10nm प्रोसेस वर तयार केला गेला आहे. Galaxy S8 त्या यूजर्ससाठी बेस्ट पर्याय आहे जे चांगला लुक असलेला फोन विकत घेण्याचा विचार करत आहेत. कॅमेऱ्याच्या बाबतीती पण हा स्मार्टफोन चांगला परफॉर्म करतो.