सर्वोत्तम फोटोग्राफीसाठी बेस्ट आहेत 64MP कॅमेरासह येणारे Smartphones, परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध
फोटोग्राफीच्या शौकीन युजर्ससाठी 64MP कॅमेरा फोन्स योग्य ठरतात.
तुम्हाला भारतात किफायशीर किमतीत 64MP कॅमेरा फोन्स मिळतील.
Lava, HMD, Realme इ. ब्रँड्सचे स्मार्टफोन्स यादीत उपलब्ध
आजकाल नवा Smartphones खरेदी करताना बहुतेक वापरकर्ते कॅमेरा आणि त्याच्या फीचर्सना पहिले प्राधान्य देतात. आता प्रत्येकाला परवडणाऱ्या किमतीत चांगला फोन हवा असतो. जर तुम्ही 64MP चा प्राइमरी कॅमेरा असलेला फोन बजेट किमतीत पाहत असाल तर, या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी अनेक पर्याय आणले आहेत. जे कमी किंमतीत चांगला फोन ठरू शकतात. या यादीत देशांतर्गत कंपनी Lava, iQOO आणि Realme यासह अनेक ब्रँडचे फोन समाविष्ट आहेत.
Also Read: iPhone लव्हर्स! लेटेस्ट iPhone 16 वर तब्बल 7000 रुपयांचा Discount, भारी ऑफर्सचा होतोय वर्षाव
IQOO Z7 Pro 5G
IQOO Z7 Pro 5G ची सुरुवातीची किंमत 20,999 रुपये इतकी आहे. फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाल्यास, iQOO Z7 Pro 5G मध्ये 4nm MediaTek Dimensity 7200 5G प्रोसेसर सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, 64MP Aura Light OIS कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा सारखी फीचर्स उपलब्ध आहे. डिस्प्लेमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन किफायतशीर किमतीत उत्तम फीचर्ससह येतो.
Lava Blaze Curve 5G
देशी कंपनी Lava चा Lava Blaze Curve 5G हा स्मार्टफोन भारतात लाँच होताच लोकप्रिय झाला. या फोनची किंमत 15,699 रुपये इतकी आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Lava Blaze Curve 5G फोन 64MP प्राइमरी सोनी सेन्सरसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन डायमेंसिटी 7050 6nm प्रोसेसरसह सज्ज आहे. एवढेच नाही तर, फोनमध्ये पॉवर सपोर्ट देण्यासाठी 33W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह बॅटरी उपलब्ध आहे.
Realme 11x 5G
Realme 11x 5G फोनदेखील कंपनीने बजेट किंमतीत लाँच केला होता. हा फोन 15000 रुपयांच्या अंतर्गत येतो, हा फोन 2023 मध्ये लाँच झाला होता. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Realme 11x 5G मध्ये 64MP+2MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन डायमेंसिटी 6100+ प्रोसेसरच्या समर्थनासह येतो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 33W सुपरव्हीओओसी चार्जरसह 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे.
HMD Crest Max 5G
HMD Crest Max 5G फोनची किंमत 16,498 रुपये इतकी आहे. हा फोन HMD ने अलीकडेच भारतीय बाजारात लाँच केला. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, HMD Crest Max 5G फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फीसाठी समोर 50MP चा सेन्सर आहे. यात 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी मोठी बॅटरी देखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजे फोन स्व-रिपेअर सुविधेसह येतो, ज्यामुळे तो इतर फोनपेक्षा नक्कीच वेगळा ठरतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile