Best Smartphones Under 10k: अगदी कमी किमतीत येतात जबरदस्त 5G फोन्स, पहा यादी

Updated on 11-Oct-2024
HIGHLIGHTS

10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्हाला चांगले 4G आणि 5G डिव्हाइसेस उपलब्ध

Lava Blaze 2 5G हा बजेटमध्ये येणारा देशी कंपनीचा स्मार्टफोन आहे.

या स्वस्त फोनमध्ये तुम्हाला उत्तम डिस्प्ले, फिंगरप्रिंट सेन्सर, प्रभावी कॅमेरा आणि चांगली बॅटरी लाइफ मिळेल.

Best Smartphones Under 10k: तुम्ही देखील बजेट फ्रेंडली स्मार्टफोन शोधत आहात का? तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्हाला चांगले 4G आणि 5G डिव्हाइसेस मिळणार आहेत. विशेष म्हणजे परवडणाऱ्या रेंजमध्ये येणाऱ्या या मोबाईलमध्येही तुम्हाला सर्व फीचर्स मिळतील. या रेंजमध्ये येणाऱ्या मोबाईल फोनमध्ये, तुम्हाला उत्तम डिस्प्ले, फिंगरप्रिंट सेन्सर, प्रभावी कॅमेरा आणि चांगली बॅटरी लाइफ देखील मिळते. येथे आम्ही 10,000 रुपयांखालील टॉप फोन्सची यादी तयार केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-

Also Read: OnePlus 13 Updates: लाँचपूर्वीच आगामी स्मार्टफोनचे डिस्प्ले डिटेल्स Leak! मिळतील इतरही विशेषता

Lava Blaze 2 5G

Lava Blaze 2 5G हा बजेटमध्ये येणारा देशी कंपनीचा स्मार्टफोन आहे. हा डिव्हाइस ‘रिंग लाइट’ फिचरसह येतो. त्यामुळे हे या श्रेणीतील एक वेगळे डिव्हाइस बनते. Lava Blaze 2 5G ची भारतात बेस 4GB रॅम व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे, तर 6GB रॅम पर्यायाची किंमत 10,999 रुपये आहे. दैनंदिन कामांमध्ये फोन चांगला परफॉर्मन्स देतो. याशिवाय, बॅटरीचे लाईफ देखील चांगले आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

POCO M6 5G

POCO M6 5G फोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये येतो. या फोनमध्ये तुम्हाला 22.5W चार्जरसह उत्तम पाहण्याचा अनुभव, चांगले सेल्फी आणि जलद चार्जिंग गतीसह चांगली कामगिरी मिळते. याशिवाय, फोन IP53 स्प्लॅश-प्रतिरोधक प्रमाणित आहे. POCO M6 फोन आकर्षक डिझाईनसह येतो. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.74-इंच लांबीचा HD+ IPS LCD डिस्प्ले आहे. कामगिरीसाठी MediaTek Dimensity 6100 Plus प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP+0.08MP आणि 5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील आहे.

Xiaomi Redmi 13C 5G

Xiaomi Redmi 13C 5G ची किंमत 8,999 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimensity 6100 Plus प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, हा फोन 50MP + 0.08MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आला आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :