Best 5G Smartphones: बघा प्रीमियम फीचर्ससह टॉप 5 स्मार्टफोन्स, स्वस्तात मस्त डील्स!

Best 5G Smartphones: बघा प्रीमियम फीचर्ससह टॉप 5 स्मार्टफोन्स, स्वस्तात मस्त डील्स!
HIGHLIGHTS

नवीन नेटवर्क वापरण्यासाठी प्रत्येकाकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.

Lava Blaze 5G सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा

खास तुमच्यासाठी 15,000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी

बजेट रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. 5G चे युग सुरु झाल्यापासून आता नवीन नेटवर्क वापरण्यासाठी प्रत्येकाकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन स्मार्टफोन कंपन्यादेखील नवनवीन पद्धतीने कमी किमतीत नवीन स्मार्टफोन बाजारात दाखल करत आहेत. आम्ही खास तुमच्यासाठी 15,000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे. 

Lava Blaze 5G

 Lava Blaze 5G हा या यादीतील पहिला स्मार्टफोन आहे. लाँन्चच्या वेळी हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, असा दावा कंपनीने केला होता. या फोनची किमंत 10,999 रुपये इतकी आहे. Lava Blaze 5G मध्ये 6.51-इंच लांबीचा HD + IPS डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोनमध्ये MediaTek चा Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. 

Redmi Note 10T 

 Redmi Note 10T यादीतील दुसऱ्या फोनची किंमत 11,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन 6.5 इंच मोठ्या डिस्प्लेसह येतो, जो 90Hz रिफ्रेश रेटवर काम करतो. ज्यामध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट उपलब्ध आहे. 

Samsung Galaxy F23 5G

Samsung Galaxy F23 5G ची किंमंत 13,499 रुपये इतकी ठेव्यण्यात आली आहे. या फोनमध्ये 6.6 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये आकर्षक फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. मागील बाजूस 50MP+8MP+8MP असा कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी पुढे देखील 8MPचा कॅमेरा देण्यात आला आहे. 

Samsung Galaxy M14 5G

Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोन तुम्हाला 13,990 रुपयांना खरेदी करता येईल. या स्मार्टफोनमध्ये Exynos 1330 Octa प्रोसेसर देण्यात आला आहे. तर फोनच्या मागील पॅनलवर 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा तुम्हाला मिळेल आणि सेल्फीसाठी 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. 

Vivo T2X 5G

Vivo T2X 5G स्मार्टफोनची किमंत 12,999 रुपये इतकी आहे. भारतात, हा फोन 4GB RAM, 6GB RAM आणि 8GB रॅम पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP + 2MP सेन्सर उपलब्ध आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेराचे समर्थन आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo