बऱ्याच टेक कंपन्या आता ग्राहकांना परवडेल अशा किमतीत जबरदस्त फीचर्ससह बजेट स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध करून देत आहेत. भारतीय बाजारपेठेत कंपन्या सातत्याने 5G स्मार्टफोन लाँच करत आहेत, जे प्रत्येक बजेटमध्ये उपलब्ध आहेत. जबरदस्त फीचर्ससह या स्मार्टफोन्सची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे. भविष्यात तुम्ही कमी बजेटमध्ये 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर पुढील यादी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
Poco M4 Pro 5G ची भारतात किंमत 14,999 रुपये आहे. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे. या डिव्हाइसमध्ये 6.6-इंच फुल-HD+ 90Hz डिस्प्ले, MediaTek Dimensity 810 प्रोसेसर, 50MP प्राइमरी कॅमेरा, 16MP सेल्फी कॅमेरा आहे. याबरोबरच, यामध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W प्रो फास्टसह येते.
Realme 9 5G ची किंमत देखील 14,999 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत फोनच्या 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. या फोनमध्ये 6.5-इंच लांबीचा फुल-HD+ डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट, मीडियाटेक डायमेन्सिटी 810 प्रोसेसर, 48MP मुख्य कॅमेरासह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 16MP सेल्फी कॅमेरा आहे. त्याबरोबरच, यामध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 18W क्विक चार्ज सपोर्टसह येते. येथून खरेदी करा…
हे सुद्धा वाचा : Infinix चा सर्वात स्लिम लॅपटॉप लवकरच भारतात लाँच होणार, स्टायलिश डिझाईनसह दमदार बॅटरी
Moto G51 5G च्या 4GB RAM + 64GB व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. हा फोन 6.8-इंच लांबीचा फुल-HD + मॅक्स व्हिजन डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्लस प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 13MP सेल्फी कॅमेरा, 5,000mAh बॅटरी आणि 20W रॅपिड चार्जिंग सपोर्टसह येतो. येथून खरेदी करा…
Redmi Note 10T ची किंमत 13,499 रुपये आहे. या फोनमध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेज उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यात 90Hz चा 6.5 इंच लांबीचा फुल-HD+ डिस्प्ले, MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 48MP बॅक कॅमेरा, 8MP सेल्फी कॅमेरा आहे. तसेच 5,000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
Oppo A53s 5G ची किंमत 14,990 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. यात 6.52-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले, 60Hz रिफ्रेश रेट, MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 13MP मुख्य कॅमेरासह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 8MP सेल्फी कॅमेरा, 5,000mAh बॅटरी आहे. येथून खरेदी करा…