Best Smartphones For Your Eyes: तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अप्रतिम आहेत ‘हे’ लेटेस्ट 5G स्मार्टफोन्स, बघा यादी। Tech News
डोळ्यांच्या आरोग्यासाठी अनेक स्मार्टफोन निर्मात्यांनी स्मार्टफोन्स सादर केले आहेत.
HONOR 90 5G मध्ये ग्राउंडब्रेकिंग झिरो रिस्क आय-कम्फर्ट डिस्प्ले आहे.
Motorola Edge Plus स्मार्टफोन आय-फ्रेंडली 6.7 इंच लांबीचा pOLED डिस्प्लेसह येतो.
गेल्या काही वर्षांपासून Smartphones आपल्या प्रत्येकाची गरज झाली आहे. आज असे क्वचितच लोक असतील ज्यांच्या हातात स्मार्टफोन आढळत नाही. आपली सर्व महत्त्वाची कामे आपल्या हातात असलेल्या स्मार्टफोनद्वारे होतात. मात्र, आपल्याला माहितीच आहे की, स्मार्टफोनचे जितके फायदे आहेत, त्यापेक्षा अधिक तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी नुकसान देखील आहेत.
हे सुद्धा वाचा: अरे व्वा! 2024 ची सर्वात स्लिम Vivo V30 सिरीज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स। Tech News
खरं तर, तरुणाई आणि लहान मुले स्मार्टफोनचा वापर जास्त कालावधीपर्यंत करत असतात. क्लासेस किंवा गेमिंगसाठी मुलांच्या हातात जास्त काळ फोन असतो. तसेच, तरुणाई देखील ऑनलाईन शॉपिंग, मिटींग्स अशी अनेक कामे स्मार्टफोनवर करत असतात. फोनची स्क्रीन अधिक वेळ पाहत राहिल्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो. यासह तुमच्या डोळ्यांना हानि होण्याची शक्यता जास्त असते. सुदैवाने स्मार्टफोन कंपन्यांनी डोळ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन अप्रतिम फोन सादर केले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या डोळ्यांसाठी सुरक्षित असलेले 5G स्मार्टफोन्स सांगणार आहोत.
BEST SMARTPHONES FOR EYES
Honor 90 5G
मागील वर्षी लाँच झालेला HONOR 90 5G ने ग्राउंडब्रेकिंग झिरो रिस्क आय-कम्फर्ट डिस्प्ले सादर केला आहे. जो सर्वोच्च आणि सुरक्षित 3840Hz PWM Dimming तंत्रज्ञानासह येतो. हे तंत्रज्ञान ब्राईटनेस कमी करते, डोळ्यांचा ताण कमी करते आणि वापरकर्त्यांना पाहण्याचा आरामदायी अनुभव सुनिश्चित करते.
Nothing Phone 2
लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनीचा Nothing Phone 2 हा बेस्ट अफोर्डेबल 5G स्मार्टफोन आहे, जो हायर ब्राईटनेस आणि 1920Hz PWM DC डीमींग तंत्रज्ञानासह येतो. त्याबोरबरच, या फोनच्या डिस्प्लेचा आकार 6.7 इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.
Motorola Edge Plus
Motorola Edge Plus स्मार्टफोन आय-फ्रेंडली 6.7 इंच लांबीचा pOLED डिस्प्लेसह येतो. डिस्प्ले अल्ट्रा-स्मूथ 144Hz रिफ्रेश स्मूदर गेमिंग, साइट स्क्रोलिंग आणि ॲप स्विचिंग ऑफर करतो. तर, HDR10+ तुम्हाला सुधारित ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट ऑफर करतो. फोनमध्ये 108MP च्या मेन सेन्सरसह क्वाड कॅमेरा सेटअप आहे.
Xiaomi 13
Xiaomi 13 स्मार्टफोन DC डीमींग OLED डिस्प्लेसह येतो, जो तुमच्या डोळ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करतो. हा स्मार्टफोन आकर्षक डिझाईनसह सादर केला गेला आहे. फोनचा डिस्प्ले 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.
Moto Edge 40 pro
Moto Edge 40 pro स्मार्टफोन देखील सेन्सिटिव्ह डोळ्यांसाठी उत्तम आणि आय-फ्रेंडली डिस्प्ले ऑफर करतो. Moto Edge 40 pro स्मार्टफोन 6.67 इंच लांबीच्या OLED डिस्प्लेसह येतो. हा डिस्प्ले 144Hz इतका रिफ्रेश रेट ऑफर करतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile