तुम्ही बजेट रेंजमध्ये चांगला स्मार्टफोन शोधत आहात का? बजेट किमतीसोबतच तुम्हाला उत्तम फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन हवा आहे का? तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. कारण सध्या भारतीय बाजारात स्वस्त किमतीत उत्तम फोटोग्राफीसाठी अनेक Smartphones उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी 50MP मेन कॅमेरासह येणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे. यामध्ये Realme, iQOO सारख्या प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माताचे डिवाइस उपलब्ध आहेत. पहा यादी-
Also Read: नवा बजेट फोन Redmi A4 5G ची भारतीय लाँच डेट जाहीर, जाणून घ्या अपेक्षित किंमत, स्पेक्स आणि बरेच काही
Realme NARZO 70x 5G फोन कंपनीने अलीकडेच भारतात लाँच केला आहे. या फोनचा 6GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या सवलतीसह Amazon वर 13,498 रुपयांना उपलब्ध आहे. कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 50MP मेन कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये रेन वॉटर टच, एअर जेश्चर फीचर, डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, IP54 रेटिंग उपलब्ध आहे.
iQOO Z9 Lite 5G फोनचा 4GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या सवलतीसह Amazon वर 10,499 रुपयांना उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा Sony AI प्रायमरी कॅमेरा आहे. त्याबरोबरच, यात 2MP चा बोकेह कॅमेरा आणि सेल्फीसाठी यात 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याला IP64 रेटिंग आहे, ज्यामुळे ते धूळ आणि पाणी प्रतिरोधक बनते. परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट उपलब्ध आहे. तर, फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W चार्जिंगला सपोर्ट करते.
देशी कंपनीचा Lava Blaze 3 5G फोन अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला होता. या फोनचा 6GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या सवलतीसह Amazon वर 11,499 रुपयांना उपलब्ध आहे. Lava Blaze 3 स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50MP प्राथमिक कॅमेरा, 2MP कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा असेल. याशिवाय, फोनच्या इतर स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.56 इंच HD+ डिस्प्ले, 18W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आणि 6GB + 128GB स्टोरेज देखील दिले गेले आहे.