32MP Front Camera Smartphones: 30 हजार रुपयांअंतर्गत सेल्फी शौकीन युजर्ससाठी बेस्ट फोन्स, पहा यादी

Updated on 13-Nov-2024
HIGHLIGHTS

अनेक स्मार्टफोन कंपंन्या आपल्या स्मार्टफोन्सच्या फ्रंट कॅमेरामध्ये अनेक अप्रतिम फीचर्स देतात.

30 हजार रुपयांअंतर्गत येणाऱ्या 32MP सेल्फी कॅमेरा फोन्सची यादी

Motorola, Realme सारख्या प्रसिद्ध कंपन्यांचे स्मार्टफोन्स यादीत सामील

32MP Front Camera Smartphones: आपण बघतच आहोत की, दीर्घकाळापासून तरुणाईमध्ये सेल्फी काढण्याचे क्रेझ सुरु आहे. तरुणाईमधील सेल्फी काढण्याचे हे क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तरुणाईची ही डिमांड बघता स्मार्टफोन निर्माता कंपंन्यांनी आपल्या स्मार्टफोन्सच्या फ्रंट कॅमेरामध्ये अनेक अप्रतिम फीचर्स देण्यास देखील सुरुवात केली आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या अप्रतिम स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग पाहुयात 30 हजार रुपयांअंतर्गत येणाऱ्या 32MP सेल्फी कॅमेरा फोन्सची यादी-

Also Read: Samsung Galaxy Z Flip FE: लवकरच येणार नवा स्वस्त फ्लिप फोन, मिळतील Galaxy S24 सीरीजचे फीचर्स

Motorola Edge 50 Fusion

Motorola Edge 50 Fusion फोनची किंमत भारतात 24,025 रुपये इतकी आहे. Motorola Edge 50 Fusion मध्ये Snapdragon 7s Gen 2, 12GB RAM, 256GB स्टोरेज, Adreno 710 GPU, 6.67-इंच 144Hz डिस्प्ले, 600 nits ब्राइटनेस, Android 14, 5,000mAh बॅटरी इ. फीचर्स आणि स्पेक्स आहेत. तसेच फोनच्या कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP Sony रीअर कॅमेरा, 13MP ultra-wide, 3MP 3MP, फ्रंट-वाईड कॅमेरा देण्यात आला आहे.

Motorola Edge 50 Neo

Motorola Edge 50 Neo

Motorola Edge 50 Neo फोनची किंमत भारतात 23,272 रुपये इतकी आहे. या किमतीत फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन अप्रतिम आहे. फोटोग्राफीसाठी Motorola Edge 50 Neo मध्ये Sony LYT-700C सेन्सरसह 50MP मुख्य कॅमेरा, 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 30x हायब्रीड झूमसह 10MP टेलिफोटो कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 6.4-इंच लांबीचा फ्लॅट pOLED 120Hz LTPO डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन 1.5K आहे आणि ब्राइटनेस 3000 nits पर्यंत आहे.

Realme 13 Pro Plus

Realme 13 Pro Plus 5G

Realme 13 Pro Plus फोनची किंमत भारतात 29,289 रुपये इतकी आहे. या Realme फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP Sony LYT-600 पेरिस्कोप कॅमेरा, 50MP Sony LYT-701 OIS कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आहे. त्याच वेळी, यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP सोनी कॅमेरा सेंसर असेल. Snapdragon 7s Gen 2 SoC द्वारे समर्थित हा फोन Android 14-आधारित Realme UI 5.0 आणि 80W SuperVOOC जलद चार्जिंग सपोर्टसह 5,200mAh बॅटरीसह येतो.

टीप: वरील सर्व स्मार्टफोन्स तुम्ही प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon India किंवा Flipkart वरून खरेदी करू शकता.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :