फोटोग्राफीसाठी बेस्ट आहेत 108MP कॅमेरासह येणारे Smartphones, किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी
108MP कॅमेरा असलेले फोन फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम आहेत.
HONOR X9b 5G स्मार्टफोन मजबूत बॉडी आणि 108MP कॅमेरासह येतो.
Realme 12 5G फोनवर बँक कार्डद्वारे 1750 रुपयांची सूटही मिळणार आहे.
तुम्ही स्वस्तात चांगला कॅमेरा असलेला फोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला Android मध्ये खरेदीसाठी अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. 108MP कॅमेरा असलेले फोन फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम आहेत. खास गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये 108MP कॅमेरा असलेले अनेक Smartphones मिळतील. चला तर मग पाहुयात 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 108MP कॅमेरा असलेले काही सर्वोत्तम पर्याय-
Also Read: Flipkart Sale मध्ये Vivo V30 Pro 5G वर मिळतोय 4000 रुपयांची सूट, पहा जबरदस्त Discount ऑफर
Realme 12 5G
तुम्ही Realme 12 5G फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 14,399 रुपयांना खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनवर बँक कार्डद्वारे 1750 रुपयांची सूटही मिळणार आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 950 nits ब्राइटनेस असलेला डिस्प्ले मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 108MP कॅमेरा आहे. तसेच, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.
Redmi 13 5G
Redmi 13 5G फोनचे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 12,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. फोनमधील फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे. चांगल्या कार्यक्षमतेसाठी, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 Gen2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 108MP प्राथमिक कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनची बॅटरी 5030mAh आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.
HONOR X9b 5G
HONOR X9b 5G फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 108MP कॅमेरा आहे. यासोबतच, फोनमध्ये 5MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनची बॅटरी 5800mAh आहे. फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 19,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile