Rs 15,000 च्या आत भारतात येणारे बेस्ट स्मार्टफोन
जर तुम्ही Rs 15,000 मध्ये एक चांगला फोन घेऊ इच्छित असाल तर आम्ही तुमचा तो शोध पूर्ण करू करू शकतो.
तुम्ही Rs 15,000 मध्ये येणार एखादा बेस्ट स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात का? तुम्हाला बाजरात या श्रेणीत अनेक स्मार्टफोन्स मिळतील. भारतात Rs 15,000 मध्ये येणारे बेस्ट स्मार्टफोन अनेक आहेत. तसेच या श्रेणीत येणाऱ्या यूजर्सची संख्या पण खूप जास्त आहे. चला तर मग सुरु करूया आणि या स्मार्टफोन्सची अधिक माहिती घेऊया. सुरवात करण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो कि हे Rs 15,000 मध्ये येणारे हे स्मार्टफोन्स फक्त किंमतीसाठी चांगले नाहीत तर हे मोबाईल फोन्स एका चांगल्या फ्लॅगशिप फोन प्रमाणे पण काम करतात. तुम्ही कशाला प्राधान्य देता याचा फरक पडत नाही या श्रेणीत तुम्हाला सर्व प्रकारचे मोबाईल फोन्स मिळतील. जर तुम्हाला कॅमेरा फोन हवा असेल तर तुम्हाला तो पण या किंमतीती पण मिळेल. तसेच यात तुम्हाला बेस्ट डिस्प्ले आणि बेस्ट डिजाईन वाले फोन्स पण मिळू शकतात. या लिस्ट मध्ये आम्ही जे मोबाईल फोन्स दिले आहेत त्यांच्यात चांगले फीचर्स आणि स्पेक्स आहेत. चला तर मग बघूया हे फोन्स…
Realme 2 Pro
Realme 2 Pro मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 SoC आहे आणि हा ओप्पोच्या कलर OS सह एंड्राइड 8.1 ओरियो वर चालतो. या मोबाईल फोन मध्ये 3,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि या मध्ये 6.3 इंचाची फुल HD+ IPS LCD स्क्रीन आहे आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे जो आजकल ट्रेंडिंग आहे आणि सोबतच डिस्प्लेच्या वरच्या बाजूला वॉटर ड्राप नॉच पण देण्यात आली आहे. स्मार्टफोन मध्ये दोन सिम कार्ड स्लॉट व्यतिरिक्त माइक्रो एसडी कार्ड स्लॉट पण देण्यात आला आहे. फोन चार्ज किंवा डाटा ट्रान्सफर करण्यासाठी माइक्रो-USB पोर्ट देण्यात आला आहे. हा फोन तीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे ज्यात ब्लॅक सी (ब्लॅक), आइस लेक (लाइट ब्लू) आणि ब्लू ओशेन (डार्क ब्लू) रंगांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी इथे जा
Xiaomi Redmi Note 5 Pro
याचा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंटची किंमत Rs. 16,999 आहे, तसेच याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंटची किंमत Rs. 13,999 ठेवण्यात आली आहे. हा गोल्ड, रोज गोल्ड, ब्लू आणि ब्लॅक रंगांत सादर करण्यात आला आहे. जर Xiaomi Redmi Note 5 Pro बद्दल बोलायचे झाले तर यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 प्रोसेसर आहे. यात 6GB चा रॅम पण आहे. या फोन मध्ये 20MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेऱ्या सह LED लाइट पण देण्यात आली आहे. यात पोर्ट्रेट सेल्फी फीचर पण देण्यात आला आहे, जो बोकेह इफेक्ट देतो. सोबतच या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप पण आहे. यात 12MP+5MP चा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी इथे जा
Asus Zenfone Max Pro M1
Asus Zenfone Max Pro M1 बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला सांगू इच्छितो कि या डिवाइस मध्ये एक 5.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले 2180×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळत आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आहे. Redmi Note 5 Pro डिवाइस मध्ये पण तुम्हाला हाच चिपसेट मिळत आहे.
फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप आहे. यात तुम्हाला एक 13-मेगापिक्सल (6GB वेरिएंट मध्ये 16 मेगापिक्सल) आणि एक 5-मेगापिक्सलचा ड्यूल सेंसर मिळत आह. तसेच फोन मध्ये एक 8-मेगापिक्सल (6GB रॅम वेरिएंट मध्ये 16 मेगापिक्सल) चा फ्रंट कॅमेरा आहे. त्याचबरोबर फोन मध्ये तुम्हाला रियर कॅमेरा सोबत एक LED फ्लॅश मिळत आहे, इसके अलावा तुम्हाला फ्रंट कॅमेरा सह एक सॉफ्ट फ्लॅश मिळत आहे. फोन मध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे, तसेच या मध्ये एंड्राइड 8.1 Oreo व्यतिरिक्त 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी पण आहे. अधिक माहितीसाठी इथे जा
Honor 9N
या डिवाइस च्या स्पेक्स आणि फीचर्स बद्दल बोलायचे तर Honor 9N स्मार्टफोन एका 5.84-इंचाच्या FHD+ 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे, सोबतच यात ओक्टा-कोर हाईसिलिकॉन Kirin 659 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये तुम्हाला 4GB रॅम मिळत आहे. तसेच स्टोरेज मध्ये वेगवेगळे वेरिएंट उपलब्ध आहेत.
Honor 9N मधील कॅमेरा बद्दल बोलायाचे तर हा डिवाइस तुम्ही 13+2-मेगापिक्सल च्या ड्यूल रियर कॅमेरा सेटअप सह घेऊ शकाल. त्याबरोबर तुम्हाला LED फ्लॅश पण मिळत आहे. तसेच तुम्हाला एक 16-मेगापिक्सल चा 2.0µm पिक्सेल सेन्सर साईज असलेला सेल्फी कॅमेरा पण मिळत आहे. फोन मध्ये एक फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे, सोबतच यात एक फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. फोन एंड्राइड 8.0 Oreo वर आधारित EMUI 8.0 वर चालतो. यात एक 3,000mAh क्षमता असलेली बॅटरी आहे. अधिक माहितीसाठी इथे जा
Xiaomi Redmi Note 6 Pro
जर या स्मार्टफोनच्या स्पेक्स बद्दल बोलायचे तर हा मोबाईल फोन म्हणजे शाओमी रेडमी नोट 6 प्रो मोबाईल फोन 6.26-इंचाच्या HD+ डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे, तसेच लक्षात घ्या कि हा 19:9 आस्पेक्ट रेश्यो सह लॉन्च करण्यात आला आहे. फोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट मिळत आहे, हा MIUI 10 वर आधारित आहे. फोन एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो. सोबतच तुम्हाला या फोन मध्ये एक 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी क्विक चार्ज 3.0 सपोर्ट सह मिळत आहे. शाओमी रेडमी नोट 6 प्रो मोबाईल फोन 4GB/6GB रॅम सोबत 64GB स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे. जर तुम्ही याची स्टोरेज वाढवू इच्छित असाल तर तुम्ही ती 256GB पर्यंत माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. तसेच फोन मध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर सोबत फेस अनलॉक फीचर पण मिळत आहे.
जर कॅमेरा इत्यादी बद्दल बोलायचे तर तुम्हाला शाओमी रेडमी नोट 6 प्रो मोबाईल फोन मध्ये तुम्हाला ड्यूल रियर आणि ड्यूल फ्रंट कॅमेरा मिळत आहे. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 12MP+5MP चा वर्टीकल ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळत आहे. तसेच फोन मध्ये तुम्हाला 20MP+2MP चा फ्रंट कॅमेरा सेटअप मिळत आहे, फोन मध्ये तुम्हाला नॉच पण मिळत आहे. अधिक माहितीसाठी इथे जा