ह्या फोनमध्ये SD 820 चिपसेट, 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल. हा फोन अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर काम करतो.
एक महिन्यापूर्वी वनप्लस 3 स्मार्टफोनला AnTuTu लिस्टिंगमध्ये असे पाहिले गेले होते. आणि आता वनप्लस 3 स्मार्टफोनला अनेक बेंचमार्क वेबसाइटवर पाहिले गेले आहे. हा गीकबेंच आणि GFX बेंचवरसुद्धा पाहिला गेला आहे. आता गीकबेंचच्या लिस्टिंगमध्ये असा खुलासा झाला आहे, की ह्या फोनमध्ये 6GB ची रॅम असेल.
त्याचबरोबर अशीही माहिती समोर आली आहे की, फोनमध्ये SD820 चिपसेट, 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल. हा फोन अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर काम करतो. ह्या फोनमध्ये एक पुर्ण HD रिझोल्युशन असलेली डिस्प्ले असेल, ह्या डिस्प्लेचा आकार 5 इंचाचा असेल. ह्याआधी समोर आलेल्या लीक्समध्ये असे सांगितले गेले होते की, ह्या फोनमध्ये 5.5 इंचाची डिस्प्ले असू शकते.
अजूनपर्यंत तरी कंपनीकडून ह्या स्मार्टफोनविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. ह्या लीक्सनुसार, ह्या फोनला 28 मे ला सादर करु शकते.