स्पेन मध्ये 24 जुलै च्या लॉन्च आधी ऑनलाइन रिटेलर च्या वेबसाइट वर दिसला Xiaomi Mi A2 स्मार्टफोन

Updated on 23-Jul-2018
HIGHLIGHTS

Xiaomi Mi A2 स्मार्टफोन 24 जुलै ला स्पेन मध्ये लॉन्च केला जाणार आहे, हा डिवाइस Mi A1 ची जागा घेईल आणि बोलले जात आहे की हा एक एंड्रॉयड वन फोन असेल.

Before official launch Xiaomi Mi A2 appeared on online retailer website: 24 जुलै ला स्पेन मध्ये आयोजित इवेंट मधून Xiaomi Mi A2 स्मार्टफोन लॉन्च होणार आहे आणि लॉन्च च्या आधी डिवाइस बद्दल भरपूर माहिती समोर आली आहे. आता काही ऑनलाइन रिटेलर्स ने स्मार्टफोन ला किंमत आणि स्पेसिफिकेशन्स सह वेबसाइट वर लिस्ट केले आहे. 

Xiaomi Mi A2 या आधी पोलंड आणि रोमानिया च्या ई-रिटेलर वेबसाइट वर दिसला होता आणि आता चीन आणि ब्रिटेन च्या रिटेलस ने डिवाइस लिस्ट केला आहे. सोबतच दोन्ही रिटेलर्स डिवाइस साठी प्री-ऑर्डर पण घेत आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही वेबसाइट्स वर फक्त Mi A2 स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे, पण Mi A2 Lite दिसला नाही. 

UK च्या ई ग्लोबल सेंट्रल आणि चीन च्या Banggood स्टोर ने Xiaomi Mi A2 चा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट को लिस्ट केला आहे. UK च्या वेबसाइट वर डिवाइस ची किंमत £209.99 (जवळपास Rs 19,000) ठेवण्यात आली आहे आणि सांगण्यात आले आहे की ही किंमत 13 टक्क्यांच्या डिस्काउंट नंतरची आहे. तर चीन च्या वेबसाइट वर डिवाइस ची किंमत Rs 16,105 दाखवण्यात आली आहे, जी Rs 18,907.05 वरून कमी करण्यात आली आहे. 

शाओमी Mi A2 हा खास फोन एक एंड्रॉयड वन फोन असू शकतो. ज्यात 5.99 इंचाचा फुल HD+1080×2160 पिक्सल डिस्प्ले असेल. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर आणि 4 GB रॅम असू शकतो. हँडसेट 32 GB, 64 GB आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेज वेरियंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. 
कॅमेरा बद्दल बोलायचे तर, Mi A2 मध्ये वर्टिकल डिजाइन वाला ड्यूल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल आणि दोन्ही सेंसर 12 आणि 20 मेगापिक्सल च्या सेंसर्स चा कॉम्बो असेल. फोन च्या फ्रंटला, 20 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा असेल. फोन चा पॉवर बॅकअप पाहता यात 3010 mAh बॅटरी असेल जी क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलजी सह येईल. कनेक्टिविटी फीचर मध्ये 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.0 आणि USB टाइप-C पोर्ट मिळू शकतात. 

वायावाया2

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :