3X ऑप्टिकल झूम लेन्ससह लाँच झाला आसूस झेनफोन झूम स्मार्टफोन

Updated on 25-Jan-2016
HIGHLIGHTS

अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या झेनफोन झूमला आसूसने भारतात लाँच केले आहे. ह्या स्मार्टफोनला 3X ऑप्टिकल झूमसह लाँच केले गेले आहे. ह्याची किंमत ३७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

आग्रामध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये आसूसने आपला नवीन स्मार्टफोन आसूस झेनफोन झूम लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनला भारतात 3X ऑप्टिकल झूमसह लाँच केले गेले आहे. ह्याची किंमत ३७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ह्या स्मार्टफोनल आपण फ्लिपकार्टच्या माध्यमातून घेऊ शकतो, त्याचबरोबर हा आसूस स्टोर्सवरसुद्धा मिळेल. जर आपण ह्या स्मार्टफोनला आसूस झेनफ्लॅशसह घेता, तर हा आपल्याला ३९,९९९ रुपयात घेऊ शकता.

 

ह्या स्मार्टफोनमध्ये स्लिम सँट्रिक कॅमेरा दिला गेला आहे आणि ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे, जो 3X ऑप्टिकल झूमने सुसज्ज आहे. फोनच्या कॅमे-यामध्ये वापरण्यात आलेली पिक्सेलमास्टर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी प्रकाशात आकर्षक इमेज क्लिक केली जाऊ शकते. ह्याच्या कॅमे-यामध्ये लेजर ऑटोफोकस फीचरसुद्धा आहे, जो ०.३ सेकंदात ऑब्जेक्टला फोकस करतो. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे.

आसूस झेनफोन झूम तायवानमध्ये दोन प्रकारात सादर केला गेला होता. पहिला प्रकार 64GB च्या अंतर्गत स्टोरेजसह 2.13GHz क्वाडकोर इंटेल अॅटम Z3580 प्रोसेसरवर काम करतो, तर दुस-या प्रकारात 128GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे आणि हा फोन 2.5GHz क्वाड-कोर इंटेल अॅटम Z3590 प्रोसेसरवर काम करतो. आसूस झेनफोन झूम 64GB प्रकाराची किंमत ४२८ डॉलर (जवळपास २८,५०० रुपये) आणि 128GB प्रकाराची किंमत 489 डॉलर (जवळपास ३२,६०० रुपये) ठेवण्यात आली आहे. दोन्ही डिवाइससोबत रियर कव्हरसुद्धा उपलब्ध होईल.

भारतात हा स्मार्टफोन 64-बिट Z3590 इंटेल सुपर क्वाड-कोर CPU सह लाँच केला गेला आहे, जो 2.5GHz ची गती देतो. स्मार्टफोनमध्ये 4GB चे LPDDR3 रॅमसुद्धा दिली गेली आहे, ज्यात 128GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो. फोनंमध्ये 3000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.

हेदेखील वाचा – केवळ ४०,९८३ रुपयात अॅप्पल आयफोन 6S होऊ शकतो तुमचा

हा स्लाइडशो पाहा- हे १० अॅप्स तरुण पिढीच्या फोनमध्ये असलेच पाहिजे

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :