मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी आसूसने झेनफोन झूम आणि झेनफोन सेल्फीसाठी अॅनड्रॉईड मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमचे अपडेट देणे सुरु केले आहे. ह्या नवीन अपडेटमुळे मार्शमॅलोचे सर्व फीचर्स ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मिळतील.
झेनफोन झूममध्ये स्लिम सँट्रिक कॅमेरा आहे आणि १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा 3X ऑप्टिकल झूमने सुसज्ज आहे. फोनच्या कॅमे-यामध्ये वापरली गेलेलीन पिक्सेलमास्टर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी प्रकाशात आकर्षक इमेज क्लिक केली जाऊ शकते. ह्याच्या कॅमे-यामध्ये लेजर ऑटोफोकस फीचरसुद्धा आहेत, जे ०.३ सेकंदात ऑब्जेक्टला फोकस करतात. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. भारतात हा स्मार्टफोन 64 बिट Z3590 इंटेल सुपर क्वाड-कोर CPU सह येतो, जो 2.5GHz ची गती देतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 4GB चे LPDDR3 रॅमसुद्धा दिली आहे. ह्यात 128GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो. फोनमध्ये 3000mAh क्षमतेची आकर्षक बॅटरीसुद्धा दिली आहे.
आसूस झेनफोन सेल्फी स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम स्लॉट दिले गेले आहे आणि हा अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉपवर चालतो. हा स्मार्टफोन 1.7GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. आसूस झेनफोन सेल्फीमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे आणि ह्याला मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
हेदेखील वाचा – पावसाळ्याच्या दिवसात खूपच फायद्याचे ठरतील हे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स
ह्यात 5.5 इंचाची 1080-1920p LCD डिस्प्ले दिली गेली आहे आणि ही गोरिला ग्लास 4 ने सुरक्षित आहे. आसूस झेनफोन सेल्फीमध्ये ड्यूल-LED फ्लॅशसह १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
हेदेखील वाचा – “फ्रीडम 251” स्मार्टफोनची डिलिवरी लांबणीवर, ६ जुलैपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा
हेदेखील वाचा – HTC डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोनची किंमत झाली कमी