आसुस झेनफोन झूम स्मार्टफोन लाँच

आसुस झेनफोन झूम स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

ह्याला तायवानमध्ये दोन प्रकारांत लाँच केले आहे. त्यातील पहिला प्रकार ६४जीबीच्या अंतर्गत स्टोरेजसह 2.13GHz क्वाड-कोर इंटेल एटॉम Z3580 प्रोसेसरवर काम करतो, आणि दुसरा प्रकार १२८जीबीच्या अंतर्गत स्टोरेजसह 2.5GHz क्वाडकोर इंटेल एटॉम Z3590 प्रोसेसरवर काम करतो.

मोबाईल निर्माता कंपनी आसुसने आपला नवीन स्मार्टफोन झेनफोन झूम लाँच केला आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला तायवान बाजारात लाँच केले आहे. ह्याला तायवानमध्ये दोन प्रकारांत लाँच केले आहे. त्यातील पहिला प्रकार ६४जीबीच्या अंतर्गत स्टोरेजसह 2.13GHz क्वाड-कोर इंटेल एटॉम Z3580 प्रोसेसरवर काम करतो, आणि दुसरा प्रकार १२८जीबीच्या अंतर्गत स्टोरेजसह 2.5GHz क्वाडकोर इंटेल एटॉम Z3590 प्रोसेसरवर काम करतो.

 

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या मध्यापर्यंत कंपनी आपल्या ह्या स्मार्टफोनला इतर देशात सादर करेल. आसुसने IFA 2015 मध्ये पहिल्यांदा आपल्या ह्या स्मार्टफोनला लोकांपुढे आणले होते.

जर ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात एक चांगला कॅमेरा दिला आहे. ह्या कॅमे-यामध्ये 3X ऑप्टिकल झूम दिली आहे. ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे. हा कॅमेरा लेजर ऑटोफोकस, ऑप्टिकल झूम स्टेब्लायझेशन आणि ड्यूल LED फ्लॅशने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.

आसूस झेनफोन झूम ६४जीबीची किंमत ४२८ डॉलर (जवळपास २८,५०० रुपये) आणि १२८जीबीची किंमत ४८९ डॉलर (जवळपास ३२,६०० रुपये) इतकी आहे. दोन्ही डिवायसेससह रियर कव्हरसुद्धा उपलब्ध होईल.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo