आसूस झेनफोन सेल्फी ZD551KL लाँच, १२,९९९ रुपयाच्या किंमतीत अॅमेझॉनवर उपलब्ध

Updated on 05-Aug-2016
HIGHLIGHTS

हा सप्टेंबरपासून रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

आसूसने भारतात एक नवीन झेनफोन सेल्फी स्मार्टफोन लाँच केला आहे. ह्या नवीन झेनफोन सेल्फीचा मॉडल नंबर ZD551KL आहे. हा नवीन झेनफोन सेल्फी डायमंड कट बॅकसह लाँच केला गेला आहे. भारतात  ह्या स्मार्टफोनची किंमत १२,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. हा सप्टेंबरपासून रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

आसूस झेनफोन सेल्फी ZD551KL क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 3GB रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला आपण 128GB पर्यंत वाढवू शकतो.

हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू

ह्यात 13MP चा f/2.2 अॅपर्चरचा वाइड अँगल (88 डिग्री) लेन्स, ड्यूल कलर रियल टोन फ्लॅश आणि सेल्फी पॅनोरमासह फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. ह्यात 3000mAh ची बॅटरी दिली आहे.

हेदेखील वाचा – १५,००० च्या किंमतीत येणारे जबरदस्त कॅमेरा स्मार्टफोन्स (जुलै २०१६)

त्याशिवाय ह्यात कनेक्टिव्हिटीसाठी 4G, ब्लूटुथ 4.0, वायफाय डायरेक्ट, GPS, AGPS, GLOSNASS आणि FM रेडियो आहे. हा फोन ग्लेशियर ग्रे, शीर गोल्ड, ब्लू आणि गुलाबी रंगात उपलब्ध होईल.

हेदेखील वाचा – एअरटेल, आयडियानंतर आता वोडाफोननेही ६७% वाढवला आपल्या डाटा पॅक्सचा फायदा
हेदेखील वाचा – Prisma App मध्ये लवकर येणार व्हि़डियो एडिटिंग फिचर

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :