Asus Zenfone Max Pro M1 स्मार्टफोन Flipkart वर 31 मे ला सेल साठी होईल उपलब्ध

Asus Zenfone Max Pro M1 स्मार्टफोन Flipkart वर 31 मे ला सेल साठी होईल उपलब्ध
HIGHLIGHTS

Asus Zenfone Max Pro M1 डिवाइस ने हे स्पष्ट केले आहे आणि हे कुठे ना कुठे तरी सत्य आहे की या डिवाइस ने Xiaomi Redmi Note 5 Pro ला चांगलीच टक्कर दिली आहे.

Asus Zenfone Max pro M1 स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर हा एप्रिल च्या शेवटी Xiaomi Redmi Note 5 Pro ला टक्कर देण्यासाठी भारतीय बाजारात आणला गेला होता. या डिवाइस मध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप सह स्टॉक एंड्राइड आणि एक मोठी 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी आहे. तसेच या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले मिळत आहे. कंपनी कडून या डिवाइस ची डिमांड पाहता याचा पुरवठा थांबवला नाही. 
या डिवाइस चे आधी पण अनेक सेल झाले आहेत आणि याचा पुढील सेल 31 मे ला दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट वर होणार आहे. या सेल मध्ये डिवाइस नवीन ग्रे कलर वेरिएंट मध्ये उपलब्ध केला जाईल. डिवाइस सेल मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये उपलब्ध केला जाईल, याच्या 3GB रॅम वेरिएंट तुम्ही Rs 10,999 मध्ये घेऊ शकता, तसेच याचा 4GB रॅम आणि 64GB वेरिएंट Rs 12,999 च्या किंमतीत घेतला जाऊ शकतो. 
Asus Zenfone Max Pro M1 बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये एक 5.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले 2180×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळत आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर सह लॉन्च केला गेला आहे. Redmi Note 5 Pro डिवाइस मध्ये पण तुम्हाला हा चिपसेट मिळत आहे. फोन 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्यतिरिक्त 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट मध्ये पण लॉन्च केला गेला आहे. तसेच याचा एक 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वर्जन लवकरच Rs 14,999 च्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.
फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे, यात तुम्हाला एक 13-मेगापिक्सल आणि एक 5-मेगापिक्सल चा ड्यूल सेंसर मिळत आहे. सोबतच फोन मध्ये एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. याव्यतिरिक्त फोन मध्ये तुम्हाला रियर कॅमेरा सह एक LED फ्लॅश मिळत आहे, तसेच तुम्हाला फ्रंट कॅमेरा सोबत एक सॉफ्ट फ्लॅश आहे. फोन मध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. त्याचबरोबर यात एंड्राइड 8.1 Oreo सह 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी आहे.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo