भारताच्या 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या फ्लिपकार्ट च्या Big Freedom सेल मध्ये असुस चे हे डिवाइस मिळत आहेत शानदार डिस्काउंट आणि ऑफर्स सह.
Flipkart 10-12 ऑगस्ट दरम्यान आपल्या एका सेल चे आयोजन करत आहे, या सेल मध्ये तुम्ही Asus Zenfone Max Pro M1 स्मार्टफोन Rs 500 रुपयांनी कमी किंमतीत विकत घेऊ शकता. याचा अर्थ असा की तुम्ही हा डिवाइस खुप स्वस्तात या सेल मध्ये विकत घेऊ शकाल. फ्लिप्कार्ट वर त्यांच्या इंडिपेंडेंस सेल मध्ये हा डिवाइस पण असेल. त्याचबरोबर तुम्ही Asus Zenfone 5Z घेऊ इच्छित असाल तर हा पण तुम्हाला शानदार ऑफर मध्ये मिळत आहे.
तीन दिवस चालणार्या या सेल मध्ये तुम्ही Asus Zenfone Max Pro M1 हा डिवाइस कमी किंमतीत विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे या सेल मध्ये कंपनी च्या 3GB मॉडेल ची किंमत कमी होऊन फक्त हा डिवाइस फक्त Rs 10,499 मध्ये मिळणार आहे, तसेच तुम्ही 4GB मॉडेल पण कमी किंमतीत म्हणजे फक्त Rs 12,499 मध्ये घेऊ शकता. पण 6GB मॉडेल ची किंमत काही कमी करण्यात आली नाही. त्याचबरोबर सिटीबँकेचे कार्ड वापरून तुम्ही हा डिवाइस 10 टक्के कॅशबॅक सह विकत घेऊ शकता.
त्याचप्रमाणे Asus Zenfone 5Z बद्दल बोलायचे तर हा डिवाइस तुम्हाला फ्लिप्कार्ट वर या सेल मध्ये Rs 3,000 च्या एक्सचेंज ऑफर सोबत मिळत आहे. त्याचबरोबर काही निवडक बँकांचे क्रेडिट कार्ड वापरून हा घेतल्यास तुम्हाला हा Rs 2,000 च्या अतिरिक्त डिस्काउंट सोबत मिळेल.