Asus Zenfone Max Pro M1 चा 6GB वेरिएंट लवकरच सेल साठी होईल उपलब्ध

Updated on 05-Jul-2018
HIGHLIGHTS

Asus ने भारतात आपला Asus Zenfone 5Z स्मार्टफोन लॉन्च केला आहे, तसेच कंपनी ने हा लॉन्च करताना अशी पण घोषणा केली होती की ते आपल्या Max Pro M1 चा 6GB वेरिएंट पण लवकरच सेल साठी घेऊन येईल.

Asus Zenfone Max Pro M1 6GB Varient to come on Sale soon on Flipkart: Asus ने आपला Asus Zenfone Max Pro M1 स्मार्टफोन एप्रिल 2018 मध्ये लॉन्च केला होता, हा स्मार्टफोन Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन ला टक्कर देण्यासाठी बाजारात आणला गेला होता. या दोन्ही स्मार्टफोंस चे स्पेक्स पाहता ते बर्‍यापैकी सारखेच आहेत. 

लॉन्च च्या वेळी हा डिवाइस तिन वेगवेगळ्या मॉडेल आणि वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला होता. हा डिवाइस लॉन्च च्या वेळी 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज त्याचबरोबर 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला होता. पण याचा 6GB वेरिएंट अजून पर्यंत सेल साठी आला नव्हता, दूसरे दोन मॉडेल कित्येकदा सेल साठी आले आहेत. पण याचा 6GB वेरिएंट अजुन पर्यंत सेल साठी आला नाही. 

कंपनी ने आपल्या Asus Zenfone 5Z स्मार्टफोन च्या लॉन्च वेळी याची पण घोषणा केली आहे की ते या महिन्याच्या शेवटी याला सेल साठी घेऊन येणार आहे. हा फ्लिपकार्ट वरून सेल साठी येईल. विशेष म्हणजे या डिवाइस ची किंमत Rs 14,999 आहे, आणि हा Redmi Note 5 Pro च्या 6GB वेरिएंट पेक्षा जवळपास 2,000 रुपयांनी कमी किंमतीत मिळेल. 

Asus Zenfone Max Pro M1 बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये एक 5.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले 2180×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळत आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर सह लॉन्च केला गेला आहे. Redmi Note 5 Pro डिवाइस मध्ये पण तुम्हाला हा चिपसेट मिळत आहे. 

फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे, यात तुम्हाला एक 13-मेगापिक्सल आणि एक 5-मेगापिक्सल चा ड्यूल सेंसर मिळत आहे. सोबतच फोन मध्ये एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. याव्यतिरिक्त फोन मध्ये तुम्हाला रियर कॅमेरा सह एक LED फ्लॅश मिळत आहे, तसेच तुम्हाला फ्रंट कॅमेरा सोबत एक सॉफ्ट फ्लॅश आहे. फोन मध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. त्याचबरोबर यात एंड्राइड 8.1 Oreo सह 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी आहे.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :