आसूस झेनफोन मॅक्स भारतात विक्रीसाठी झाला उपलब्ध

आसूस झेनफोन मॅक्स भारतात विक्रीसाठी झाला उपलब्ध
HIGHLIGHTS

९९९९ रुपयाच्या किंमतीत येणारा आणि पॉवरप्रमाणे काम करणारा हा स्मार्टफोन आता ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमातून मिळणे सुुरु झाले आहे.

आसूसने आपल्या झेनफोन सीरिजमध्ये वाढ करुन एक नवीन स्मार्टफोन आसूस झेनफोन मॅक्स अलीकडेच लाँच केला होता. ह्या स्मार्टफोनची किंम ९,९९९ रुपये आहे. आणि आता हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि स्नॅपडीलच्या माध्यमातून तसेच ऑफलाइनसुद्धा मिळणे सुरु झाले आहे.

 

ह्या स्मार्टफोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये नॉन-रिमूव्हेबल बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, ह्या स्मार्टफोनमध्ये 38 तासांचा टॉकटाइम आणि 914 तासांचा स्टँडबाय टाइम दिला आहे.

 

 

बाजारात ह्याच क्षमतेचे असलेल्या स्मार्टफोनशी आसूस झेनफोन मॅक्स ला कडक मुकाबला करावा लागेल. जिओनी मॅरेथॉन M4 स्मार्टफोनसुद्धा ह्याच क्षमतेच्या बॅटरीसह १५,४९९ रुपयात उपलब्ध आहे. ह्याला मागील वर्षी बाजारात लाँच केले गेले होते. ह्या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर बाजारात अजून एक स्मार्टफोन उपलब्ध आहे, ज्याचे नाव आहे लेनोवो वाइब P1. ह्यात 4900mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे आणि ह्या स्मार्टफोनची किंमत १५,९९९ रुपये आहे. ह्याला मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच केले आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची HD 720×1280 पिक्सेलची IPS डिस्प्ले दिली गेली आहे. हा फोन ZenUI 2.0 वर आधारित अॅनड्रॉईड ५.० लॉलीपॉपवर काम करतो. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 1GHz क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात 2GB रॅमसु्द्धा आहे. स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो. हा स्मार्टफोन भारतातील इतर झेनफोनसारखाच आहे. त्याचबरोबर हा भारतीय LTE  बँड्सलासुद्धा सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये एक्सेलेरोमीटर, कंपास, प्रोक्सिमिटी आणि एम्बियंट लाइट सेंसरसुद्धा दिला आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo