आसूस झेनफोन मॅक्स स्मार्टफोनच्या किंमतीत झाली खूप मोठी घट
ह्या स्मार्टफोनला आपण अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडिलच्या माध्यमातूून खरेदी करु शकता.
फ्लिपकार्टवर खरेदी करा आसूस झेनफोन मॅक्स केवळ ८,९९९ रुपयात
अॅॅमेझॉन इंडियावर खरेदी करा आसूस झेनफोन मॅक्स केवळ ८,९९९ रुपयांत
स्नॅपडिलवर खरेदी करा आसूस झेनफोन मॅक्स केवळ ८,९९९ रुपयात
आसूस झेनफोन मॅक्स स्मार्टफोनला कंपनीने भारतात ह्याच वर्षी जानेवारीमध्ये लाँच केले होते आणि त्यावेळी ह्या स्मार्टफोनची किंमत ९९९९ रुपये होती. मात्र आता ह्या स्मार्टफोनची किंमत १००० रुपयांनी कमी केली आहे आणि आता हा स्मार्टफोन ८,९९९ रुपयात मिळत आहे. ह्याला आपण अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडिलच्या माध्यमातून खरेदी करु शकता.
ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्याची 5000mAh क्षमतेची बॅटरी . आपण ह्याला एका पॉवर बँक प्रमाणेही वापरू शकता. कंपनीनुसार हा स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यास हा जवळपास ३७.६ तासांचा टॉक टाइम किंवा ३२.५ तासांचा वायफाय वेब ब्राउझिंग किंवा ७२.९ तासांचा म्यूजिक प्लेबॅक किंवा २२.६ तासांचा व्हिडियो प्लेबॅक देण्यास सक्षम आहे.
बाजारात ह्याच क्षमतेचे असलेल्या स्मार्टफोनशी आसूस झेनफोन मॅक्स ला कडक मुकाबला करावा लागेल. जिओनी मॅरेथॉन M4 स्मार्टफोनसुद्धा ह्याच क्षमतेच्या बॅटरीसह १५,४९९ रुपयात उपलब्ध आहे. ह्याला मागील वर्षी बाजारात लाँच केले गेले होते. ह्या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर बाजारात अजून एक स्मार्टफोन उपलब्ध आहे, ज्याचे नाव आहे लेनोवो वाइब P1. ह्यात 4900mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे आणि ह्या स्मार्टफोनची किंमत १५,९९९ रुपये आहे. ह्याला मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच केले आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची HD 720×1280 पिक्सेलची IPS डिस्प्ले दिली गेली आहे. हा फोन ZenUI 2.0 वर आधारित अॅनड्रॉईड ५.० लॉलीपॉपवर काम करतो. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 1GHz क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात 2GB रॅमसु्द्धा आहे. स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो. हा स्मार्टफोन भारतातील इतर झेनफोनसारखाच आहे. त्याचबरोबर हा भारतीय LTE बँड्सलासुद्धा सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये एक्सेलेरोमीटर, कंपास, प्रोक्सिमिटी आणि एम्बियंट लाइट सेंसरसुद्धा दिला आहे.
हेदेखील वाचा – भारतात सुरु झाली LG G5 ची प्री-बुकिंग, पाहा कोणत्या साइटवर झाला लिस्ट
हेदेखील वाचा – अॅनड्रॉईड मार्शमॅलोवर चालणारा आसूस झेनफोन मॅक्स स्मार्टफोन लाँच