मोबाईल निर्माता कंपनी आसूसने भारतीय बाजारात झेनफोन मॅक्सचे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. हा स्मार्टफोन दोन मेमरी पर्यायासह उपलब्ध होईल. ह्या नवीन स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरसुद्धा दिले आहे.
आसूस झेनफोन मॅक्स (2016) स्मार्टफोनच्या 2GB रॅम आणि 3GB रॅम व्हर्जनची किंमत ९९९९ रुपये आणि १२,९९९ रुपये आहे. ह्या नवीन फोनमध्ये 1.5Ghz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. हा फोन अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर चालतो. हा नवीन स्मार्टफोन निळा आणि नारिंगी अशा दोन रंगात उपलब्ध होईल. ह्या स्मार्टफोनचे 2GB रॅम व्हर्जन सध्यातरी फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध आहे, तर 3GB रॅम व्हर्जन लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होईल.
जानेवारीमध्ये लाँच झालेल्या झेनफोन मॅक्स स्मार्टफोनमध्ये क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. अजूनही कंपनी आपल्या ह्या जुन्या व्हर्जनची विक्री करत आहे. ह्या फोनची किंमत ८,९९९ रुपये आहे.
ह्या झेनफोन मॅक्स 2016 मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, ह्या फोनने आपण दुस-या फोनला चार्जसुद्धा केले जाऊ शकते. फोनच्या बॅटरीला आपण काढू शकत नाही. ह्या फोनमध्ये 5.5 इंचाची HD IPS TFT डिस्प्ले आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. फोनची मेमरी मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
हेदेखील वाचा – लवकरच तुम्ही तुमच्या आयफोन टच आयडीने करु शकाल MAC अनलॉक
हेदेखील वाचा – VoLTE सपोर्टने सुसज्ज आहे इंटेक्स अॅक्वा सिक्युअर स्मार्टफोन