मोबाईल निर्माता कंपनी आसूसने भारतात आपला नवीन स्मार्टफोन झेनफोन गो 4.5 भारतात लाँच केला आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत ५,२९९ रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन एक्सक्लुसिव्हली ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
यूजरला ह्या स्मार्टफोनसह 100GB चे गुगल ड्राइव्ह स्टोरेज २ वर्षांसाठी मोफत मिळेल. त्याशिवाय आसूस वेबवर 5GB चे स्टोरेज लाइफटाइमसाठी मोफत मिळेल.
आसूस झेनफोन गो 4.5 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4.5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 854×480 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन मिडियाटेक चिपसेट, 1.3GHz क्वाडकोर-प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
त्याचबरोबर ह्यात ऑटोफोकस आणि LED फ्लॅशचा ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे.
त्याशिवाय हा ड्यूल सिम स्मार्टफोन 3G, वायफाय आणि इतर स्टँडर्ड कनेक्टिव्हिटी फीचरने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित झेन युआय 2.0 वर चालतो आणि ह्यात 1600mAh ची बॅटरी दिली गेली आहे. आसूस झेनफोन गो 4.5 काळ्या रंगात उपलब्ध होईल.