आसूसने लाँच केला एक बजेट स्मार्टफोन, किंमत ५,२९९ रुपये

Updated on 25-Apr-2016
HIGHLIGHTS

ह्याच्या एक व्हर्जनमध्ये ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल. ह्या व्हर्जनची किंमत ५,२९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुस-या व्हर्जनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.

मोबाईल निर्माता कंपनी आसूसने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन झेनफोन गो 4.5 लाँच केला आहे. हा फोन बाजारात दोन वेगवेगळ्या कॅमेरा पर्यायासह लाँच होतील. ह्याच्या एक व्हर्जनमध्ये ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल. ह्या व्हर्जनची किंमत ५,२९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुस-या व्हर्जनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्याची किंमत ५,६९९ रुपये असेल.

कंपनीने सांगितले आहे की, आसूस झेनफोन गो 4.5 स्मार्टफोन वेगवेगळ्या शॉपिंग साइट्स जसे फ्लिपकार्ट, स्नॅपडिल, अॅमेझॉन, पेटिएमवर उपलब्ध होईल. तसेच हा कंपनीच्या स्टोर्स आणि ऑफलाइन स्टोर्सवर सुद्धा मिळेल.

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित झेन UI वर चालतो. हा 8GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्याच्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो. कंपनी ह्या फोनसह 100GB चे फ्री क्लाउड स्टोरेजसुद्धा देत आङे. ह्या नवीन फोनमध्ये क्वालकॉम प्रोसेसर दिला गेला आहे. ह्या फोनमध्ये 1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसर 1GB रॅमसह देण्यात आला आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. हा 3G, GPRS/EDGE, GPS/A-GPS, ब्लूटुथ आणि मायक्रो-USB सारखे फीचर्स दिले आहेत ह्यात 2070mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ह्याचे वजन १२५ ग्रॅम आहे.

हेदेखील वाचा – ZTE ब्लेड A910, ब्लेड V7 मॅक्स भारतात लाँच
हेदेखील वाचा – 
Le Max, Le Max आणि वनप्लस 2 मध्ये कोणता फोन आहेत सर्वात उत्कृष्ट

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :