नवीन स्मार्टफोन म्हणून, Asus आपला Asus Zenfone 9 स्मार्टफोन 28 जुलै रोजी लॉन्च करणार आहे. या कॉम्पॅक्ट आकाराच्या फोनमध्ये अनेक उत्तम फीचर्स मिळतील. अलीकडेच, हँडसेटचा एक प्रोमो व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करण्यात आला होता, ज्यामध्ये फोनचे काही प्रमुख फिचर उघड झाले होते. असे म्हटले जात आहे की, नवीन Asus फोन 120Hz रिफ्रेश रेट 5.9-इंच लांबीचा Samsung Amoled डिस्प्ले सह येईल. फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिप सह सुसज्ज असण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि सिक्स- ऍक्सिस गिम्बल स्टॅबिलायझरसाठी सपोर्ट असू शकतो.
हे सुद्धा वाचा : Vi च्या ग्राहकांची मौज, स्वस्त रिचार्जमध्ये मिळेल दररोज 4GB डेटा, जाणून घ्या 'हा' अप्रतिम प्लॅन
Asus ने त्यांच्या अधिकृत वेबसाईट द्वारे घोषणा केली आहे की, त्यांचा नवीन स्मार्टफोन Zenfone 9 28 जुलै रोजी लॉन्च होईल. कार्यक्रम न्यूयॉर्कमध्ये सकाळी 9 वाजता, बर्लिनमध्ये दुपारी 3 वाजता आणि तैपेईमध्ये रात्री 9 वाजता (भारतीय वेळेनुसार 6.30 वाजता) सुरू होईल. लॉन्च इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पाहता येईल. आत्तापर्यंत, वेबसाइटवर Zenfone 9 चे कोणतेही तपशील किंवा किंमत उघड झालेली नाही. कंपनीने अद्याप भारतासाठी लाँच टाइमलाइन देखील घोषित केलेली नाही.
अलीकडे, Asus Zenfone 9 चा एक कथित प्रोमो व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करण्यात आला होता, ज्यामध्ये हँडसेटची काही प्रमुख फीचर्स उघड झाली होती. स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 5.9-इंच लांबीचा Samsung AMOLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. व्हिडिओमध्ये, फोन होल-पंच डिस्प्ले डिझाइनसह अनेक कलर ऑप्शन्समध्ये दाखवला गेला आहे. हे Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपद्वारे समर्थित असल्याचे म्हटले जाते.
व्हिडिओनुसार, Asus Zenfone 9 मध्ये LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. यात 50-मेगापिक्सेल सोनी IMX766 प्रायमरी लेन्स असण्याची अपेक्षा आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील मिळेल, असे सांगितले जात आहे. हँडसेटमध्ये 4300mAh बॅटरी असल्याचे सांगितले जात आहे. यात ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक देखील मिळू शकतो. फोन पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP68 रेटिंगसह दाखवले गेले आहे. असे म्हटले जाते की, हे Zenfone 8 चे अपग्रेड आहे, जो मे 2021 मध्ये लॉन्च झाला होता.