Asus Zenfone 6 प्रोटोटाइप्स वरून स्मार्टफोनच्या ट्रिपल कॅमेरा सेटअपचा झाला खुलासा

Updated on 29-Oct-2018
HIGHLIGHTS

मोबाईल फोन निर्माता कंपनी असुस ने आपल्या आगामी नवीन मोबाईल फोन Asus Zenfone 6 साठी प्रोटोटाइप्स जारी केले आहे. Asus Zenfone 6 प्रोटोटाइप्स वरून अंदाज लावला जाऊ शकतो कि कंपनी कशाप्रकारचा प्रोडक्ट घेऊन येणार आहे.

खरं तर असुसचा आगामी फोन Zenfone 6 यायला कित्येक महिन्यांचा अवधी बाकी आहे पण त्याच्या प्रोटोटाइप चे फोटो लीक झाले आहेत. या लीक फोटो वरून तुम्ही कंपनी कशाप्रकराचा प्रोडक्ट मार्केट मध्ये आणणार आहे याचा अंदाजा लावू शकता. यावरून असुस चे इंजीनियर आगामी प्रोडक्ट बनवण्यासाठी किती मेहनत घेत आहेत याची पण माहिती मिळते. नवीन स्मार्टफोन बनवण्यासाठी कंपनी वेगवेगळे प्रयोग करत आहे. विशेष म्हणजे सध्यातरी कंपनी ने फक्त प्रोटोटाइप जारी केला आहे, त्यामुळे आगामी फाइनल प्रोडक्ट यापेक्षा वेगळा असण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. 

लक्षात ठेवायची बाब अशी कि Asus Zenfone 6 पुढ्यल्यावर्षी लॉन्च केला जाईल. या प्रोटोटाइप मध्ये तुम्हाला अनेक डिजाइन आईडिया आणि कॅमेरा पोजिशन्स बघायला मिळतील. तुम्हाला यात फ्रंट कॅमेरा साठी एक छोटा डिस्प्ले कटआउट पण दिसेल. या समोर आलेल्या फोटो मध्ये तुम्हाला एक डिस्प्लेने वेढलेला कॅमेरा दिसेल आणि आता फोटो मध्ये Essential PH-1 प्रमाणे डिस्प्ले कटआउट दिसेल. 

Asus Zenfone 5z की स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
कंपनी ने MWC 2018 मध्ये Asus Zenfone 5 आणि Zenfone 5 Lite सोबतच Asus Zenfone 5z चा पण खुलासा केला होत. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात तुम्हाला 6.2 इंचाची फुल HD+ एड्ज टू एड्ज स्क्रीन मिळते. हा डिवाइस Qualcomm Snapdragon 845 Chipset वर चालतो. तसेच जर स्टोरेज पाहता तुम्हाला 8GB रॅम मिळतो. याच सोबत तुम्हाला 256GB ची इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे. तुमची फोटोग्राफी चांगली करण्यासाठी या मोबाईल फोनच्या बॅकला ड्यूल कॅमेरा सेट-अप देण्यात आला आहे ज्यात 1.4 माइक्रॉन पिक्सेल सोबत 12 मेगापिक्सेलचा प्राइमरी सेंसर असेल. तसेच दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सेल सेकेंडरी सेंसर सह येईल ज्याने तुम्ही 120 डिग्री वाइड एंगलने फोटो कॅप्चर करू शकता तसेच पोर्ट्रेट मोड मध्ये शॉट्स घेऊ शकता. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :