Asus Zenfone 5Z आणि Sony Xperia XZ2 आता Vodafone VoLTE ला पण करतील सपोर्ट

Asus Zenfone 5Z आणि Sony Xperia XZ2 आता Vodafone VoLTE ला पण करतील सपोर्ट
HIGHLIGHTS

सध्यातरी Asus Zenfone 5Z आणि Sony Xperia XZ2 दोन असे खास स्मार्टफोन्स आहेत ज्यांना Vodafone VoLTE चा सपोर्ट मिळाला आहे.

सध्यातरी Asus Zenfone 5Z आणि Sony Xperia XZ2 दोन असे खास स्मार्टफोन्स आहेत ज्यांना Vodafone VoLTE चा सपोर्ट मिळाला आहे. जवळपास 122 स्मार्टफोन्स या यादीत आहेत जे या सेवेला सपोर्ट करतात. पण जर एयरटेल बद्दल बोलायचे झाले तर या लिस्ट मध्ये जवळपास 200 डिवाइस आहेत. याचा अर्थ असा की वोडाफोनच्या पण पुढे एयरटेल आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Infinix Smart 2, Honor Play, आणि Samsung Galaxy Note 9 स्मार्टफोन्सना पण याचा सपोर्ट मिळाला आहे. 

Asus Zenfone 5Z स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
फीचर्स आणि स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस एका 6.2-इंचाच्या FHD+ एज-टू-एज नॉच स्क्रीन सह लॉन्च करण्यात आला आहे, हा 1080×2246 पिक्सल रेजोल्यूशन सह आला आहे. फोनच्या या डिस्प्ले च्या आस्पेक्ट रेश्यो बद्दल बोलायचे झाले तर हा 19:9 आहे. फोन मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच हा 8GB चा अधिकतम रॅम आणि 256GB च्या अधिकतम स्टोरेज सोबत लॉन्च करण्यात आला आहे. फोन मध्ये तुम्हाला हाइब्रिड ड्यूल सिम स्लॉट्स देण्यात आले आहेत. 

आम्ही सांगितल्याप्रमाणे या डिवाइस मध्ये तुम्हाला ड्यूल कॅमेरा मिळत आहे, या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा मिळत आहे, तसेच यात तुम्हाला एक 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा पण मिळत आहे. फोन मध्ये एक 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण आहे. तसेच यात एक 3,300mAh क्षमता असलेली बॅटरी पण मिळत आहे. जी फास्ट चार्जिंगला पण सपोर्ट करते. हा डिवाइस एंड्राइड Oreo वर चालतो जो ZenUI वर आधारित आहे. फोन मध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. 

फोनच्या कनेक्टिविटी ऑप्शन्स बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 4G VoLTE सह ब्लूटूथ, ड्यूल सिम, वाई-फाई 802.11 ac, GPS आणि USB Type C पोर्ट पण देण्यात आला आहे. फोन या किंमतीत आणि स्पेक्स तसेच फीचर्स पाहता Honor 10 आणि OnePlus 6 ला चांगली टक्कर देत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo