Asus Zenfone 5 Max स्नॅपड्रॅगन 660 सह गीकबेंच वर दिसला
Asus Zenfone 5 Max स्मार्टफोन मध्ये एंड्रॉयड 8.0 ओरियो असू शकतो.
Asus ने मोबाइल वर्ल्ड कांग्रेस मध्ये Zenfone 5 सीरीज ची घोषणा केलेली, ज्यात Zenfone 5z, Zenfone आणि Zenfone 5 Lite होते, पण यात Zenfone 5 Max चा कोणताही उल्लेख नव्हता.
आता Zenfone 5 Max स्मार्टफोन बद्दल पण चर्चा होत आहे. Wi-Fi सर्टिफिकेशन नंतर Zenfone 5 Max स्मार्टफोन गीकबेंच दिसला आहे पण या फोनच्या अधिकृत घोषणेची तयारी अजून तरी झाली नाही.
या डिवाइस ला स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट आणि 4GB रॅम आणि एंड्रॉयड 8.0 ओरियो सह गीकबेंच वर दिसला आहे. म्हणजे हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालेल आणि यात एंड्रॉयड चा लेटेस्ट वर्जन एंड्रॉयड 8.0 ओरियो असण्याची शक्यता आहे.
पण, गीकबेंच स्कोर वरून Zenfone 5 Max स्मार्टफोन बद्दल अजुन कोणतीही माहिती मिळाली नाही, किंवा या डिवाइस च्या डिजाइन आणि दुसर्या फीचर्स बद्दल जास्त काही माहिती मिळाली नाही. पण आशा आहे की या डिवाइस च्या स्पेसिफिकेशन बद्दल लवकरच लीक समोर येतील.