HIGHLIGHTS
Asus ZenFone 5 Lite च्या लीक फोटोज नुसार फोन मध्ये डुअल रियर कॅमरा सोबत डुअल फ्रंट कॅमरा पण असेल. सोबतच फोन मध्ये असू शकतो FHD+ डिस्प्ले.
Asus येणार्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2018 मध्ये काही स्मार्टफोन्स लाँच करू शकते. 27 फेब्रुवारीला Asus च्या लाँच इवेंट मध्ये ZenFone 5 सीरीज च्या लाँचचा खुलासा झाला आहे. पण आता टिप्सटर इवान ब्लास च्या नव्या लीक वरून ZenFone 5 Lite च्या लाँच ची पण शक्यता दिसतेय. ब्लास ने ZenFone 5 Lite डिवाइस ची एक इमेज आणि काही स्पेसिफिकेशनची माहिती दिली आहे.
ह्या स्मार्टफोन मध्ये क्वॉड कॅमरा सेटअप, म्हणजेच डुअल फ्रंट कॅमरा आणि डुअल रियर कॅमरा सेटअप असणार आहे. लीक इमेज वरून समजतय की फोन च्या बॅक साइडला वर्टिकल डुअल रियर कॅमरा सेटअप असेल, ज्याच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर असेल. फ्रंट साइडला 2 कॅमरे स्पीकर ग्रिल च्या दोन्ही बाजूस फ्रंट फेसिंग फ्लॅश सोबत असतिल.
सांगण्याची गरज नाही की, Asus ZenFone 5 Lite ची खासियत याचा कॅमरा असेल. लीक वर विश्वास ठेवला, तर ZenFone 5 Lite हा 20MP च्या डुअल फ्रंट कॅमरा आणि 16MP च्या डुअल रियर कॅमरा सोबत येईल. ह्या लीक वरून दुसर्या स्पेसिफिकेशन च्या बाबतीत काहीही माहिती मिळत नाही, पण यात उल्लेख आहे की ZenFone 5 Lite मध्ये FHD+ डिस्प्ले असेल, डिस्प्ले च्या साइज बाबतीत कोणताही उल्लेख करण्यात आला नाही, पण वेबसाइट वर आलेल्या आधीच्या रिपोर्ट नुसार ह्या फोन मध्ये 18:9 अॅस्पेक्ट रेशियो वाला 6 इंचाचा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.
ZenFone 5 Lite, नावावरुनच समजतंय की हा फोन ZenFone 5 च्या तुलनेने कमी पावरफुल डिवाइस असू शकतो. अशा आहे की हा फोन 18:9 अॅस्पेक्ट रेशियो सह 5.7 इंचाच्या डिस्प्ले सह लाँच होईल. या फोन मध्ये डुअल रियर कॅमरा, एंड्रॉयड ओरियो आउट ऑफ द बॉक्स, माइक्रो USB पोर्ट आणि एक 3.5mm हेडफोन जॅक असण्याची शक्यता आहे.