जूनमध्ये लाँच होऊ शकतो, आसूस झेनफोन 3 लाँच

जूनमध्ये लाँच होऊ शकतो, आसूस झेनफोन 3 लाँच
HIGHLIGHTS

आसूसच्या सीईओंनी सांगितले आहे की, आसूस झेनफोन 3 चा मुख्य उद्देश बाजारात मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच कऱणे आहे.

मोबाईल निर्माता कंपनी आसूसने आपल्या स्मार्टफोन रेंजमध्ये झेनफोन 3 ला जूनमध्ये लाँच करेल. असे कंपनीचे सीईओ Jerry Shen यांनी सांगितलय. एका टेक साइटच्या रिपोर्टनुसार, Shen चे म्हणणे आहे की, झेनफोन 3 स्मार्टफोनचा मुख्य उद्देश बाजारात मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करणे आहे. मात्र आसूसने त्यांच्या नवीन डिवाइसच्या हार्डवेयर स्पेसिफिकेशनविषयी कोणताही खुलासा केलेला नाही. त्यांनी असेही सांगितले आहे होते की, झेनफोन 3 सीरिज ऑगस्टमध्ये 6 देशांत उपलब्ध होईल. त्याचबरोबर Shen ने झेनफोन 3 मॅक्सविषयी सुद्धा खुलासा करताना असे सांगितले आहे की, झेनफोन 3 मॅक्स झेनफोन 3 शिपमेंटच्या २ ते ३ टप्प्यांत कवर करेल. त्याशिवाय झेनफोन 3 च्या दुस-या प्रकारात झेनफोन 3 डिलक्स आणि झेनफोन 3 विषयी सुद्धा अनेक खुलासे केले गेले आहे.
 

शेनने असेही सांगितले आहे की, ह्या वर्षी लाँच होणा-या ९० टक्के झेनफोन 3 स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम प्रोसेसर असेल. झेनफोन 2 सीरिजमध्ये जास्तकरुन इंटेल चिपसेट आहे.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये अशी बातमी आली होती की, आसूस झेनफोन 3 ला 2016 च्या मे किंवा जून महिन्यात लाँच करण्याच्या तयारित आहे. ह्या डिवाइसमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि USB Type-C पोर्ट्ससुद्धा असू शकतात. आसूसचे दोन फोन मॉडल नंबर Z010DD आणि Z012D GFX बेंचमार्क साइटवर लिस्ट झाले होते.

हेदेखील वाचा – स्नॅपचॅट वन हँड झूम फीचरसह झाला अपडेट
हेदेखील वाचा – 
लवकरच आपल्याला मिळणार “मेड इन इंडिया” आयफोन्स?

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo