आसूस झेनफोन 3 लेजर, झेनफोन 3 मॅक्स लाँच
ह्या दोन स्मार्टफोन्सच्या नावावरुन असे वाटत आहे की, हे दोन्ही स्मार्टफोन्स बाजारात कंपनीच्या झेनफोन 2 लेजर आणि झेनफोन मॅक्सची जागा घेतील.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी आसूसने बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन झेनफोन 3 लेजर आणि झेनफोन 3 मॅक्स लाँच केले. ह्या फोन्सच्या नावावरुन कळत आहे की, हे दोन्ही स्मार्टफोन्स बाजारात कंपनीच्या झेनफोन 2 लेजर आणि झेनफोन मॅक्सची जागा घेतील. ह्या दोन्ही स्मार्टफोन्सला कंपनीने व्हिएतनाममध्ये झालेल्या एका कार्यक्रमात लाँच केले. हे स्मार्टफोन भारतात कधी लाँच होतील, ह्या विषयी कंपनीने आतापर्यंत कोणतीही माहिती दिलेली नाही.
आसूस झेनफोन 3 लेजरच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर, ह्याची किंमत ५,९९०,००० VND (साधारण १८,००० रुपये) आहे. ह्या फोनमध्ये 13 MP चा कॅमेरा दिला आहे.
हेदेखील वाचा – भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…
तर झेनफोन 3 मॅक्सची किंमत ४,४९०,००० VND (जवळपास १३,४०० रुपये) आहे. ह्या फोनमध्ये 5.2 इंचाची IPS डिस्प्ले दिली आहे. ही डिस्प्ले 2.5D कर्व्ह्ड डिस्प्लेसह येते. ह्या स्मार्टफोनमध्ये 4100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, हा २० तासांचा टॉकटाइम देते.
हेदेखील वाचा – आयफोन 7, 7 प्लस, 7 प्रो च्या किंमतीचा झाला खुलासा
हेदेखील वाचा – लेनोवो वाइब C2 स्मार्टफोन: अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 ने सुसज्ज