आसुस झेनफोन २ लेजरचा 3GB रॅम व्हर्जन केवळ १३,९९९ रुपयांत

Updated on 27-Oct-2015
HIGHLIGHTS

आसुस झेनफोन २ लेजर आता आपल्याला फ्लिपकार्टच्या माध्यमातून केवळ १३,९९९ रुपयांत मिळत आहे. जर आपण ह्या स्मार्टफोनला घेऊ इच्छिता तर, हा घेण्याची हीच खरी योग्य वेळ आहे.

आसुस इंडियाने सोमवारी अशी घोषणा केली आहे की, त्याचा झेनफोन २ लेजर ५.५ आता आपल्याला फ्लिपकार्टच्या माध्यमातून केवळ १३,९९९ रुपयांत उपलब्ध होईल.

 

आसुसने आपले झेनफोन सेल्फी, झेनफोन२ लेजर ५.५ आणि झेनफोन डिलक्स२ साठी ऑगस्टपासूनच प्री-ऑर्डर घेणे सुरु केले होते. आणि आता फ्लिपकार्टच्या माध्यमातून आपण आसुसचा झेनफोन २ लेझर ५.५ ज्यात 3GB रॅम दिली गेली आहे. आणि त्याचबरोबर हा आपल्याला ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसरसोबत येईल, ज्याची किंमत १३,९९९ ठेवण्यात आली आहे.

कंपनीने ह्या स्मार्टफोनच्या लाँचवेळी ऑगस्टमध्ये सांगितले होते की, वन आपल्या झेनफोन स्मार्टफोनच्या सीरिजला फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकेल. तसेच त्यांना रिटेल स्टोर्सच्या माध्यमातूनसुद्धा विकले जाईल. त्याचबरोबर ह्या सर्व स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर प्रक्रियासुद्धा सुरु केली होती. हे सर्व स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड ५.० लॉलीपॉपवर आधारित आहे. त्याचबरोबर हा 4G LTE सपोर्टसह ड्यूल-सिम सपोेर्टसुद्धा मिळेल.

ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला ५.५ इंचाची HD 720×1280 पिक्सेल IPS डिस्प्ले मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज,ज्याला आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने १२८जीबीपर्यंत वाढवू शकता. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला ३०००mAh क्षमता असलेली बॅटरीसुद्धा मिळत आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा लेजर ऑटोफोकससोबत मिळत आहे आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे.

जर ह्याच्या तपशीलाबाबत बोलायचे झाले तर, ह्यात आपल्याला कोर्निंग गोरिला ग्लास ४ चे संरक्षण मिळत आहे. एड्रेनो 405 GPU, अॅनड्रॉईड ५.० लॉलीपॉप जो आपल्याला कंपनी त्याच्या झेन UI 2.0 देत आहे.

Ashvani Kumar

Ashvani Kumar is Tech, Politics, and Sports lover.

Connect On :