Xiaomi नंतर आता Asus पण लॉन्च करू शकतो आपला गेमिंग स्मार्टफोन

Xiaomi नंतर आता Asus पण लॉन्च करू शकतो आपला गेमिंग स्मार्टफोन
HIGHLIGHTS

इंटरनेट वर येणार्‍या काही बातम्यांनुसार असे बोलले जात आहे की Asus चा हा गेमिंग फोन रेजर फोन सह Xiaomi च्या ब्लॅक शार्क स्मार्टफोन ला पण टक्कर देईल.

Asus ने आपले काही गेमिंग लॅपटॉप तर आणले आहेत, तुम्हाला असुस च्या स्त्रिक्स आणि ROG सीरीज बद्दल तर माहित असेल. पण आता असे समोर येत आहे की कंपनी Xiaomi आणि Razer Phone प्रमाणे आपला एक गेमिंग स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. याचा अर्थ असा की कंपनी आपली ताकद आपला स्मार्टफोंस सह गेमिंग साठी खास फोंस लॉन्च करून दाखवणार आहे. 

असुस चे ग्लोबल CEO Jerry Shen ने Astig।ph वर सांगितले की कंपनी आपला असा एक स्मार्टफोन लॉन्च करू शकते जो खासकरून गेमिंग साठी असेल. एंड्राइड अथॉरिटी च्या एका रिपोर्ट चे म्हणणे आहे की याची माहिती कंपनी च्या CEO ने फिलीपिंस मधे आपल्या 100व्या स्टोर च्या ओपनिंग च्या वेळेस दिली होती. पण या माहिती व्यतिरिक्त कंपनी ने या स्मार्टफोन च्या लॉन्च इत्यादी बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. 

पण या सीरीज मध्ये जास्त फोंस नाही आहेत त्यामुळे कंपनी कडून लॉन्च होणार्‍या या सीरीज वर सर्वांची नजर असणार आहे. विशेष म्हणजे जगत फक्त दोन मोठ्या कंपन्यांनी गेमिंग स्मार्टफोंस च्या रुपात आपले फोंस लॉन्च केले आहेत, यात Razer Phone सामील आहेत. तसेच आता यात Xiaomi कडून काही दिवसांपूर्वी सादर केलेला Black Shark स्मार्टफोन आहे. 
Xiaomi च्या ब्लॅक शार्क डिवाइस बद्दल बोलायचे झाले तर हा आता काही दिवसांपूर्वी लॉन्च केला गेला आहे. याच्या स्पेक्स पाहता हा एका 5.99-इंचाच्या FHD+ डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे, जो एक 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे. तसेच यात एक स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत यात 8GB चा रॅम सह लॉन्च केला गेला आहे. 

फोन मध्ये एक ड्यूल 12-पिक्सल आणि 20-मेगापिक्सल चा सेंसर दिला गेला आहे. तसेच या फोन मध्ये एक 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण आहे. यात एक 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी क्विक चार्ज 3.0 च्या सपोर्ट सह देण्यात आली आहे. फोन एंड्राइड 8.1 Oreo सह सादर करण्यात आला आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo