Asus ROG Phone 7 सिरीजची सेल भारतात सुरू, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

Asus ROG Phone 7 सिरीजची सेल भारतात सुरू, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
HIGHLIGHTS

Asus ROG Phone 7 गेमिंग सीरीज भारतात सेल सुरु

Yes आणि RBL बँकेच्या क्रेडिट कार्डच्या खरेदीवर 2000 रुपयांची सूट

हँडसेटमध्ये External Cooler देखील देण्यात आला आहे.

अलीकडेच Asus ROG Phone 7 गेमिंग सीरीज भारतात लाँच झाली आहे. भारतात या फोनची सेल सुरू झाली आहे. या लाइनअपचे ROG Phone 7 आणि ROG Phone 7 Ultimate स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि विजय सेलवमधून खरेदी केले जाऊ शकतात. या दोन्ही उपकरणांवर उत्तम ऑफर्स दिल्या जात आहेत. 

Asus ROG Phone 7 सिरीज किंमत 

 

 

ROG Phone 7 स्मार्टफोनची किंमत 74,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या किंमतीत 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध असतील. तर, 16GB RAM आणि 512GB स्टोरेज टॉप-एंड मॉडेल ROG Phone 7 Ultimate 99,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. 

ऑफर्स : 

 Yes आणि RBL बँकेच्या क्रेडिट कार्डच्या खरेदीवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय HSBC च्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 7% सूट मिळेल. त्याबरोबरच, 3600 रुपयांच्या नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरवरही स्मार्टफोन खरेदी करता येईल.

Asus ROG Phone 7 

Asus Rogue Phone 7 सिरीज स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीचा E4 फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz चा आहे. दोन्ही उपकरणांमध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. दोन्ही मोबाईल नवीनतम Android 13 वर कार्य करतात.

फोन अल्टिमेट 6000mAh जंबो बॅटरीसह येतात. यासह 30W हायपर फास्ट चार्जिंग देखील मिळेल. विशेष म्हणजे हँडसेटमध्ये External Cooler देखील देण्यात आला आहे. या सिरीजमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये पहिला 50MP मेन लेन्स, दुसरा 13MP अल्ट्रा वाइड आणि तिसरा 8MP डेप्थ लेन्स आहे. त्याबरोबरच, 32MP कॅमेरा फ्रंटमध्ये उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo