आसूसचा पेगासूस 5000 स्मार्टफोन झाला लाँच

Updated on 22-Jan-2016
HIGHLIGHTS

आसूसने आपला नवीन स्मार्टफोन पेगासूस 5000 चीनच्या बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन २ वेगवेगळ्या प्रकारात लाँच झाला आहे.

आसूसने आपला नवीन स्मार्टफोन पेगासूस 5000 चीनच्या बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन २ वेगवेगळ्या प्रकारात लाँच झाला आहे. 2GB रॅम असलेला स्मार्टफोन आपल्याला CNY 1299 (जवळपास १३, ३५० रुपये) आणि 3GB रॅम असलेला स्मार्टफोन आपल्याला CNY 1799 (जवळपास १८,५०० रुपये) मध्ये खरेदी करु शकता.

 

ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात 4850mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनला चीनच्या बाहेर कधी लाँच केले जाईल, ह्याविषयी मात्र कंपनीकडून अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित कंपनीच्या स्वत:च्या जेन UI वर चालतो. ह्यात ५.५ इंचाची पुर्ण HD 1080×1920 पिक्सेल रिझोल्युशनची IPS डिस्प्ले दिली आहे, जी गोरिला ग्लासने संरक्षित आहे. फोनमध्ये 1.3GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6753 प्रोसेसर दिला गेला आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा LED फ्लॅश आणि f/2.0 अॅपर्चरसह दिला आहे. तसेच ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. एक जपानी ब्लॉगनुसार, ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, 3G, वायफाय, ब्लूटुथ, GPS आणि मायक्रो-USB सपोर्ट दिला आहे.

ह्याआधी कंपनीने आपला पेगासूस 2 प्लस स्मार्टफोन लाँच केला होता. जर ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले 1080×1920 पिक्सेल रिझोल्युशनसह दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 64 बिट क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसरसह 3GB ची रॅमसुद्धा दिली आहे.

हा स्लाइडशो अवश्य पाहा-  हे १० अॅप्स तरुण पिढीच्या फोनमध्ये असलेच पाहिजे

          हेदेखील वाचा-          ओवरकार्टवर फ्लॅश सेलद्वारा मिळणार वनप्लस 2 स्मार्टफोन

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :