आसूसच्या नवीन झेनफोन 3 मध्ये आहे 6GB ची रॅम, किंमत २४९ डॉलरपासून सुरु
आसूसने कंम्प्युटेक्स 2016 मध्ये तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले. हे स्मार्टफोन्स आहेत आसूस झेनफोन 3, झेनफोन 3 डिलक्स आणि झेनफोन 3 अल्ट्रा.
आसूसने कंम्प्युटेक्स 2016 मध्ये तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले. हे स्मार्टफोन्स आहेत आसूस झेनफोन 3, झेनफोन 3 डिलक्स आणि झेनफोन 3 अल्ट्रा. ह्या स्मार्टफोन्समध्ये सर्वात स्टँडर्ड व्हर्जनमध्ये 2.5D गोरिला ग्लास ने सुसज्ज असलेली 5.5 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि 4GB रॅमसह 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला ऑटोफोकस, PDAF दिला गेला आहे. कॅमे-यामध्ये आपल्याला 4 एक्सिस OIS फीचरसुद्धा मिळत आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत २४९ डॉलर म्हणजेच जवळपास १६,७०० रुपयांपासून सुरु होते.
झेनफोन 3 डिलक्समध्ये मेटल यूनीबॉडीसह हिडन एंटेना लाइन्ससुद्धा दिली गेली आहे. ह्यात आपल्याला 5.7 इंचाची FHD SUPER AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे. हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह 6GB ची रॅमसुद्धा दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये 23MP चा कॅमेरा पिक्सेलमास्टर 3.0 तंत्रज्ञानासह दिला गेला आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला ट्रिटेक ऑटोफोकस, सोनी IMX 318 सेंसर आणि 4-एक्सिस OIS दिली गेली आहे. ह्यात आपल्याला USB टाइप-C3.0 आणि 64GB ची स्टोरेज मिळत आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ४९९ डॉलर म्हणजेच ३३,६०० रुपये आहे.
हेदेखील पाहा – .. तर असा होता परमाणु हत्यारांचा इतिहास आणि कार्य
आसूस झेनफोन 3 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये ६.८ इंचाची FHD डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसरसह 4GB ची रॅमसुद्धा मिळत आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये डिलक्ससारखे 23MP चा कॅमेरा ट्रिटेक ऑटोफोकससह दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला फिंगरप्रिंट सेंसरसह 4600mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा दिली गेली आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला बॅटरीसह क्विक चार्ज 3.0 सुद्धा दिले गेले आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत 479 डॉलर म्हणजेच 32,200 रुपये आहे.
हेदेखील वाचा – HTC वन M9 प्लस कॅमेरा एडिशन लाँच, ह्यात आहे उत्कृष्ट कॅमेरा फिचर्स
हेदेखील वाचा – ओप्पो लवकरच आणणार आपला फोल्डेबल स्मार्टफोन