Asus आज भारतात Asus ROG Phone 6 सिरीज लॉन्च करणार आहे. या मालिकेअंतर्गत, ROG Phone 6 आणि ROG Phone 6 Pro हे दोन स्मार्टफोन आणले जातील. ही एक गेमिंग स्मार्टफोन सीरीज असणार आहे. स्मार्टफोन जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह आणले जात आहेत. स्मार्टफोन्सचे लॉन्चिंग भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.20 वाजता सुरू होईल. चला तर जाणून घेऊयात फोनची संभाव्य किंमत आणि फीचर्सबद्दल माहिती…
हे सुद्धा वाचा : Airtel चा 912 GB डेटा प्लॅन बघितलं ? वर्षभराच्या वैधतेसह मिळेल अमर्यादित कॉल्स, मोफत हॉटस्टार सब्स्क्रिप्शन
Asus ROG Phone 6 ची भारतात किंमत 59,000 ते 65,000 रुपये असू शकते. तसेच, प्रो वेरिएंटची किंमत 79,000 ते 85,000 रुपयांपर्यंत ठेवली जाऊ शकते. फोनसोबत काही गेमिंग अॅक्सेसरीजही येतील, ज्याचे पैसे वेगळे द्यावे लागतील. तुम्हाला लाँच इव्हेंट Asus इंडियाच्या YouTube चॅनेलवर थेट पाहता येईल.
Asus ROG Phone 6 Geekbench, 3C आणि TENAA सारख्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर पाहिले गेले आहे. यावरून फोनच्या बहुतेक फीचर्सची कल्पना येते. सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटद्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे. ROG फोन 6 मध्ये FHD+ रिझोल्यूशन आणि 165Hz रिफ्रेश रेटसह मोठा 6.78-इंच लांबीचा OLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे.
फोनमध्ये 18GB पर्यंत रॅम आणि 1TB स्टोरेज दिले जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी, 64MP प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल-कॅमेरा रिअर सेटअप दिला जाईल. फोनला 6,000mAh बॅटरी मिळेल, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन चार्ज करण्यासाठी दोन USB Type-C चार्जिंग पोर्ट उपलब्ध असू शकतात.