अॅक्वा मोबाइल्स एक भारतीय टेक कंपनी आहे, ज्यांनी मंगळवारी आपला एक फीचर फोन अॅक्वा पर्ल बाजारात आणला आहे. ह्या फोनची किंमत केवळ ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. जर आपण एक फीचर फोन घेण्याचा विचार करत असाल, तर आपण हा फोन घेऊ शकता. ह्या फोनला जवळपास सर्व ऑनलाइन रिटेलर्सच्या माध्यमातून घेऊ शकता.
हा एक ड्यूल सिम सपोर्ट करणारा फोन आहे. ज्यात २.४ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे आणि हा स्प्रेडट्रम 6531D वर चालतो. त्याचबरोबर ह्यात 32MB ची रॅमसुद्धा आहे.फोनमध्ये आपल्याला 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे. त्याशिवया अॅक्वा पर्ल फोनमध्ये 0.3 मेगापिक्सेलचा VGA रियर कॅमेरा LED फ्लॅश मिळत आहे.
कंपनीनुसार, ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे 1600mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. जी जवळपास पुर्ण १ दिवस चालते. त्याशिवाय फोनमध्ये FM रेडियो आणि मल्टीलिंग्युअल भाषा सपोर्टसुद्ध आहे.
अॅक्वा मोबाइल्सने भारतात मागील महिन्यात आपला आणखी एक फोन अॅक्वा 3G 312 लाँच केला होता. ह्या ड्यूल सिम फोनमध्ये 4 इंचाची WVGA 480×800 पिक्सेल रिझोल्युशनची IPS डिस्प्ले आणि ड्यूल कोर (Cortex-A7) मिडियाटेक MTK6572 प्रोसेसर दिला आहे, जो 1.2GHz वेग देतो. त्याशिवाय ह्यात 512MB ची रॅमसुद्धा आहे. फोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. फोनमध्ये आपल्याला 4GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे.