प्रसिद्ध टेक जायंट Apple चे मोठे लॉन्चिंग या आठवड्यात होणार आहे. कंपनी या आठवड्यात Apple M4 वर चालणारे Macs लाँच करणार आहे. मात्र, यासह कंपनी इतर उत्पादनांमध्ये देखील खूप गुंतवणूक करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडील रिपोर्ट्सनुसार कंपनी लवकरच iPhone SE 4 मॉडेल सादर करण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या की, आधीच्या सीरिजप्रमाणे हा फोनदेखील परवडणाऱ्या किमतीत लाँच केला जाईल. जाणून घेऊयात सविस्तर-
Also Read: Amazon Sale चा शेवटचा दिवस उद्या! लेटेस्ट iPhone 16 वर मिळतेय Best ऑफर, स्वस्तात खरेदी करण्याची संधी
2025 ला आता केवळ दोन महिन्यांचा अवधी उरला आहे. आपण पुढील वर्षी हा स्वस्त iPhone लाँच होण्याची अपेक्षा करू शकतो. आता या फोनबाबत एक मोठे अपडेट आले आहे. रिपोर्टमध्ये iPhone SE 4 च्या लाँच टाइमचा उल्लेख करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, हा फोन पुढील वर्षाच्या सुरुवातीला लाँच केला जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, iPhone SE 4 मार्च 2025 पर्यंत दाखल होऊ शकतो.
त्याबरोबरच, अहवालानुसार iPhone SE 4 या सिरीजमधील सर्वात मोठ्या अपग्रेडसह येणार आहे. एवढेच नाही तर, आगामी फोनमध्ये अनेक AI फीचर्स देखील पाहायला मिळतील. Apple 2025 च्या पहिल्या तिमाहीत iPhone SE 4 लाँच करण्याची योजना आखत आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या iPhone 16 मालिकेत Apple Intelligence फीचर आणि कॅमेरा कंट्रोलने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, iPhone SE मॉडेलला iPhone 14 सारखे डिझाइन दिले जाऊ शकते. कंपनी हा फोन OLED डिस्प्ले सह लाँच केला जाऊ शकतो. वर सांगितल्याप्रमाणे, या फोनमध्ये AI फीचर सपोर्ट मिळू शकतो. त्यानुसार, कंपनीला या नवीन फोनमध्ये A17 Pro किंवा A18 चिपसेट द्यावा लागेल. फोटोग्राफीसाठी, यात 48MP प्रायमरी कॅमेरा आणि 6GB रॅम दिली जाऊ शकते.
तसेच, पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये उत्तम बॅटरीसह चार्जिंगसाठी USB C चे समर्थन असण्याची अपेक्षा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, जे iPhone लव्हर्स महागडे iPhone मॉडेल्स खरेदी करू शकता नाही. त्यांच्यासाठी iPhone SE सिरीज नेहमीच बेस्ट ठरली आहे. कारण ही सिरीज सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी असते. हा फोन पुढील वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान कधीही सादर केला जाऊ शकतो.