Apple च्या आगामी तीन नवीन iPhones बद्दल इंटरनेट वर एक मोठी बातमी समोर आली आहे. माहिती नुसार iPhone XS, iPhone 9 आणि iPhone XS Plus चे पोस्टर लीक झाले आहेत. ही माहिती फ्रेंच मीडिया च्या माध्यमातून समोर आली आहे.
गेल्याच आठवड्यात एका विडियो मधून Apple iPhone 2018 ची लाइनअप दिसली होती. या विडियो मध्ये पण हे iPhones जवळपास याच नावाने दाखवण्यात आले होते, ज्या नावाने हे आज च्या पोस्टर मधून समोर आले आहेत.
तुम्हाला तर माहितीच आहे की अॅप्पल आपल्या तीन नवीन iPhones वर काम करत आहे, यातील एक मॉडेल iPhone X च्या जेनेरेशन मध्ये लॉन्च केला जाणार आहे. त्याचबरोबर एक मिड-रेंज मॉडेल असेल, तसेच अजून एक मॉडेल मोठया स्क्रीन सह लॉन्च केला जाऊ शकतो. ही माहिती फ्रेंच मीडिया च्या माध्यमातून समोर आली आहे आणि हे फोटो Les Numeriques ने शेयर केले आहेत.
इथे तुम्ही हे फोटो बघू शकता. यात तुम्हाला iPhone XS, Iphone 9 आणि iPhone XS Plus दिसत आहेत. iPhone XS बद्दल बोलायचे झाले तर हा iPhone X च्या जेनेरेशन मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, जो एका 5.8-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो, तसेच यात तुम्हाला ग्लास बॅक, वायरलेस चार्जिंग आणि ड्यूल कॅमेरा मिळू शकतो. तसेच iPhone 9 बद्दल बोलायचे तर हा एका 6.1-इंचाच्या LCD डिस्प्ले, ग्लास बॅक, वायरलेस चार्जिंग आणि सिंगल कॅमेरा सह लॉन्च केला जाऊ शकतो.
शेवटचा आणि तिसरा डिवाइस म्हणजे iPhone XS Plus पाहता हा एका मोठ्या स्क्रीन सह लॉन्च केला जाऊ शकतो, यात तुम्हाला एक 6.5-इंचाची OLED स्क्रीन मिळू शकते. तसेच यात तुम्हाला ग्लास बॅक बरोबर वायरलेस चार्जिंग सोबत ड्यूल कॅमेरा मिळू शकतो.