Apple यावर्षी 4 नवीन iPhone करू शकते लॉन्च, किंमती बद्दल समोर आली माहिती

Apple यावर्षी 4 नवीन iPhone करू शकते लॉन्च, किंमती बद्दल समोर आली माहिती
HIGHLIGHTS

एक नवीन रिपोर्ट मधून समोर येत आहे की अॅप्पल आपल्या दुसर्‍या पिढीचा iPhone SE स्मार्टफोन या महिन्यात लॉन्च करणार आहे, तसेच iPhone X चे तीन नवीन वेरिएंट यावर्षी सप्टेंबर मध्ये लॉन्च होण्याची बातमी आहे.

जवळपास अर्धा वर्ष संपत आला आहे आणि आता पर्यंत एकही 2018 Apple आयफोन दिसला नाही. पण हे सर्व बदलणार आहे, कारण फोर्ब्स च्या एका विशेष रिपोर्ट नुसार, आपल्याला जून मध्ये एक नवीन आयफोन एसई सह येणार्‍या महिन्यांमध्ये चार नवीन आयफोन दिसतील. 
रिपोर्ट वर विश्वास ठेवल्यास, आयफोन एसई दुसर्‍या पिढीतील मॉडेल असेल. अफवा नुसार हा आयफोन एक्स च्या मिनी वर्जन सारखा दिसेल, फोर्ब्स चा रिपोर्ट सांगतो की हा एकच डिजाइन आणि नाव पण तेच असेल, पण यात चांगल्या स्पेसिफिकेशन्स सह सादर केला जाईल. पण एवढे माहिती आहे की किंमत आता फक्त $ 350 (जवळपास 23,500 रुपये) नसेल. आयफोन एसई स्वतः, तुमच्या लक्षात यावे म्हणून, मूळ आयफोन 5 चे नवीन वर्जन आहे, जो सप्टेंबर 2012 मध्ये जारी करण्यात आला होता. 
सप्टेंबर मध्ये दुसर्‍या पीढी च्या क्लब मध्ये नवीन आयफोन एक्स सामील होईल, ज्यात एक मोठा आयफोन एक्स प्लस आणि आयफोन एक्स चा एक स्वस्त पण मोठा वर्जन आहे. याला नाव द्यायचे झाले तर 'बजेट आयफोन एक्स' असे देता येईल. यात 6-इंच डिस्प्ले किंवा 5-इंचाचा असण्याची शक्यता आहे. एक मेटल चेसिस, सिंगल रीयर कॅमेरा आणि फेस आईडी स्पोर्टिंग, बजेट आयफोन एक्स $550 (जवळपास 37,000 रुपये) रुपयांमध्ये येऊ शकतो. जो आयफोन 8 च्या किंमतीच्या $699 (जवळपास 47,000 रुपये) आसपास आहे. 
Apple कडून आयफोन एक्स प्लस ची किंमत $1000 (जवळपास 67,000 रुपये) पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. Apple पण सर्व मॉडेल सोबत फास्ट चार्जर सामील करणार आहे, ज्यामुळे आउटगोइंग आयफोन एक्स जवळपास $200 (13,400 रुपये) ची बचत होऊ शकते. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo