iPhone युजर्स सावधान! नवीन स्पायवेअर करू शकतो अटॅक, बचावासाठी काय कराल? Apple ने दिला इशारा 

iPhone युजर्स सावधान! नवीन स्पायवेअर करू शकतो अटॅक, बचावासाठी काय कराल? Apple ने दिला इशारा 
HIGHLIGHTS

Apple ने काही वापरकर्त्यांना Pegasus सारख्या स्पायवेअरद्वारे लक्ष्यित होण्याच्या जोखमीबद्दल चेतावणी दिली

ही चेतावणी वापरकर्त्यांना त्यांच्या iPhones वर संभाव्य स्पायवेअर हल्ल्याबद्दल सतर्क करेल.

2021 पासून, Apple ने 150 हून अधिक देशांमधील वापरकर्त्यांना या सूचना पाठवल्या आहेत.

Apple चे जगभरात चाहते पसरलेले आहेत. मात्र, Apple iPhone च्या भारतीय युजर्ससाठी एक चिंताजनक बातमी पुढे आली आहे. Apple ने भारतातील त्यांच्या काही वापरकर्त्यांना इशारा दिला आहे की, त्यांचे डिव्हाइस Pegasus सारख्या ‘किरायाच्या स्पायवेअर हल्ल्याचे’ संभाव्य लक्ष्य बनू शकतात. Apple ने 10 जुलैच्या नोटिफिकेशन मेलमध्ये म्हटले आहे की,”किरायाचे स्पायवेअर हल्ले जसे की, ते अटॅक NSO ग्रुपच्या Pegasus चा वापर करत आहेत, ते खूप कमी आहेत. त्याबरोबरच, सामान्य सायबर क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज किंवा कंज्यूमर मालवेअरपेक्षा कॉम्प्लेक्स आहेत.

Also Read: Samsung ने लाँच केले Galaxy Buds 3 आणि Buds 3 Pro नवे इयरबड्स, AI करेल लाइव्ह ट्रान्सलेशन

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, भारत आणि जगभरातील इतर 98 देशांमधील वापरकर्त्यांना पाठवलेल्या आणखी एका अधिसूचनेत कंपनीने म्हटले आहे की, हे स्पायवेअर वापरकर्त्यांच्या उपकरणांवर नियंत्रण देखील मिळवू शकते. 2021 पासून, Apple ने 150 हून अधिक देशांमधील वापरकर्त्यांना या सूचना पाठवल्या आहेत.

‘या’ स्पायवेअरपासून तुमचा iPhone सुरक्षित कसा ठेवायचा?

स्पायवेअरसारख्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी, Apple ने आपल्या iPhone वापरकर्त्यांना युनिक ‘लॉकडाउन मोड’ अनेबल करण्याचा सल्ला दिला आहे. हे पेगासस सारख्या जटिल स्पायवेअरपासून iPhone चे संरक्षण करते. हल्ल्याचा धोका कमी करण्यासाठी हे काही ॲप्स, वेबसाइट्स आणि फीचर्स मर्यादित करते. याशिवाय, Apple ने यूजर्सना त्यांचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवण्याचा आणि मजबूत पासवर्ड ठेवण्याचा सल्लादेखील दिला आहे. तुम्ही आयफोन वापरकर्ता असल्यास, अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

स्पायवेअरपासून तुमचा iPhone सुरक्षित कसा ठेवायचा?

Apple ने दिली माहिती

Apple ने टार्गेटेड iPhone वापरकर्त्यांना हे देखील सूचित केले की, “अशाप्रकारच्या अटॅकमध्ये संभाव्यपणे लाखो डॉलर्स खर्च करतात आणि थोड्या संख्येने वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी डिप्लॉय केले जातात. परंतु लक्ष्यीकरण सुरुच राहते आणि ते जगभरात घडते.” तुमच्या माहितीसाठी सांगतो की, ऑक्टोबर 2023 मध्ये, Apple ने भारतासह काही देशांमधील वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसवर ‘स्टेट-स्पॉन्सर्ड’ अटॅकचा इशारा देऊन समान सूचना पाठवली.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या आणि मीडिया सल्लागार इल्तिजा मुफ्ती आणि समृद्ध भारत फाऊंडेशनचे संस्थापक पुष्पराज देशपांडे यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट X वर सांगितले की, Apple ने त्यांना त्यांचा फोन संभाव्य हॅक झाल्याची सूचना पाठवली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo